शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

यवतमाळ अर्बन ‘सहकार’कडे

By admin | Updated: January 14, 2016 03:13 IST

१६ पैकी १२ जागा जिंकल्या : तीन जागांचे निकाल रोखले, एक जागा समन्वयकडे

यवतमाळ : यवतमाळ अर्बन को-आॅप. बँकेच्या निवडणुकीत जाहीर झालेल्या सर्व बाराही जागा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार पॅनलने जिंकल्या आहेत. तीन जागांचे निकाल न्यायालयीन प्रक्रियेमुळे १९ जानेवारीपर्यंत राखून ठेवण्यात आले आहे. तर समन्वयचा एक उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आला. मनोहर देव-अजय मुंदडा-आशीष उत्तरवार यांच्या नेतृत्त्वात ‘सहकार’ पॅनलने १५ जागा लढविल्या, तर भाऊसाहेब मारोडकर-सुशील कोठारी यांच्या नेतृत्वात समन्वय पॅनलने १३ जागा लढविल्या. दोन जागांवरील त्यांचे उमेदवार उच्च न्यायालयाने बाद ठरविले होते. आतापर्यंतच्या १७ ते २० टक्के मतदान झालेल्या या बँकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच ४० टक्केपर्यंत मतदानाचा पल्ला गाठला गेला. समन्वय पॅनलने सर्व ताकदीनिशी केलेली तयारीच हा आलेख वाढविण्यास कारणीभूत ठरली. या पॅनलला विजय मिळविता आला नसला तरी, सहकारच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या जवळपास जाता आले.मतमोजणीला येथील गुरुदेव मंगल कार्यालयात मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. दुपारपर्यंत मतपत्रिका जुळविण्याचेच काम चालले. दुपारी ४ वाजता पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्याचवेळी जवळपास चित्र स्पष्ट झाले होते. सहकारच्या सर्व उमेदवारांनी आघाडी घेतली होती. बुधवारी पहाटे सर्व निकाल जाहीर करण्यात आले. उमेदवारांच्या विजयाची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांकडून विजयी जल्लोष केला जात होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यवतमाळच्या सहायक निबंधक तथा प्रभारी जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे यांनी काम पाहिले. उमेदवारांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.उमेदवारांना मिळालेली मतेसहकार पॅनल - प्रशांत माधमशेट्टीवार (१६४६५), संजय पालतेवार (१७१६८), संजय डेहनकर (१७३१४), गोवर्धन राठोड (१६७५०), प्रमोद धुर्वे (१७१४४), मीरा घाटे (१६७०४), वैदेही नायगावकर (१५२८६), मोहन देव (१३८८९), नितीन खर्चे (१५६७३), अजय मुंधडा (१६०५०), चंद्रकांत रानडे (१५७५०), आशीष उत्तरवार (१५३९४).समन्वय पॅनल - भाऊसाहेब मारोडकर (१२५५७), गजानन बेजंकीवार (११७५३), प्रकाश गोकुळे (११५३७), श्रीनिवास अडपावार (१२७५८), अरविंद पट्टे (११७८३), पुष्पा गांधी (१२३८३), रमेश बोचरे (१११०६), अभयसिंह घुईखेडकर (१०७४९), सुशील कोठारी (१११३९), पांडुरंग खांदवे (११२०४). श्रीधर देशपांडे यांनी १५४७ मते घेतली आहेत. (वार्ताहर)