लोकमत न्यूज नेटवर्कआदिलाबाद : यवतमाळ व लगतच्या तेलंगाणा राज्यात तांबा तार चोरी करणारी टोळी जेरबंद झाली आहे. आदिलाबाद पोलिसांनी त्यांच्याकडून एक किलो तांब्याच्या तारेसह मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने आत्तापर्यंत ८८ ट्रान्सफार्मर तोडून त्यातील तांबा तार लंपास केल्याचे धक्कादायक वास्तव पोलीस तपासात पुढे आले आहे.जमालुद्दिन खान (४०), आरिफ शहा (२५), गोपाल बोबडे (२५) रा.बाभूळगाव, गणेश पिंपळकर (२८) रा.कळंब, ज्ञानेश्वर यलकर (३२) रा.बाभूळगाव असे अया आरोपींचे नाव आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार राम करण पासवान हा फरार आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक विष्णू वरियर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.या टोळीकडून यवतमाळ जिल्ह्यासह आदिलाबादमधील अनेक गुन्ह्यांची कबुली मिळाली आहे. यांनी हा तांबा तार विकलेल्या व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी रडारवर घेतले आहे. या आरोपींना यवतमाळ जिल्हा पोलिसांनी ताब्यात घेतल्यास येथील विद्युत रोहित्र चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यवतमाळच्या चोरट्यांना आदिलाबादमध्ये अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 06:00 IST