शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

Yavatmal : टेट पास झालात? यवतमाळात ५१९ जागा तुमच्यासाठीच! अनुदानित शाळांची संचमान्यता आली

By अविनाश साबापुरे | Updated: August 3, 2023 19:29 IST

Yavatmal: बीएड धारकांनो, तुम्ही टेट परीक्षा पास झाला असाल तर ही खुशखबर तुमच्यासाठीच आहे. जिल्ह्यातील अनुदानित शाळांच्या संचमान्यता झाल्या असून त्यात तब्बल ५१९ शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे पुढे आले आहे.

- अविनाश साबापुरे यवतमाळ - बीएड धारकांनो, तुम्ही टेट परीक्षा पास झाला असाल तर ही खुशखबर तुमच्यासाठीच आहे. जिल्ह्यातील अनुदानित शाळांच्या संचमान्यता झाल्या असून त्यात तब्बल ५१९ शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे पुढे आले आहे. तर दुसरीकडे केवळ १५६ शिक्षक अतिरिक्त ठरलेत. त्यामुळे समायोजनानंतरही बेरोजगारांच्या भरतीसाठी जवळपास पाचशे जागा उपलब्ध होणार आहेत.

२०२२-२३ या शैक्षणिक सत्राची शिक्षक संचमान्यता शिक्षणाधिकाऱ्यांच्या लाॅगीनला आली असून आता संबंधित शाळांपर्यंत संचमान्यता पोहोचविण्यात आली आहे. या संचमान्यतेच्या गोषवाऱ्यानुसार, जिल्ह्यातील १९५ खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या तब्बल ५१९ शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याची बाब पुढे आली आहे. तर ८७ शाळांमध्ये १५६ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळे शिक्षणाधिकारी डाॅ. जयश्री राऊत यांनी संबंधित मुख्याध्यापकांना पत्र पाठवून अतिरिक्त शिक्षकांचे प्रथम संस्थेंतर्गत समायोजन करण्याची सूचना केली आहे. त्यानंतरही उरणाऱ्या अतिरिक्त शिक्षकांची माहिती जिल्हा स्तरावर पाठविण्याची सूचना केली आहे. परंतु, या दीडशे शिक्षकांचे समायोजन झाल्यावरही पवित्र पोर्टलद्वारे पदभरतीसाठी जवळपास पाचशे जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अभियोग्य परीक्षा दिलेल्या बीएडधारक उमेदवारांसाठी संधी चालून येणार आहे. 

कोणत्या तालुक्यात किती रिक्त आणि अतिरिक्त तालुका : रिक्त : अतिरिक्त आर्णी : ६६ : ०७बाभूळगाव : १३ : ०९दारव्हा : ४० : ०९दिग्रस : २९ : ०४घाटंजी : ३५ : १०कळंब : ३५ : ०५महागाव : ३२ : ०७मारेगाव : २० : ०९नेर : २९ : ०८पांढरकवडा : २१ : १०पुसद : ६३ : ११राळेगाव : १३ : २४उमरखेड : ३७ : ०३वणी : २७ : १८यवतमाळ : ४५ : १७झरी : ०५ : ०५

जागा आणखी वाढणार ज्या शाळांमधील ८५ टक्के पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले, त्याच शाळांच्या संचमान्यता अंतिम करण्यात आल्या आहे. त्यामुळे पुढील काळात आणखी काही शाळांच्या संचमान्यता येऊन रिक्त आणि अतिरिक्त या दोन्हींचे आकडे वाढण्याची शक्यता आहे. तसेच जिल्हा परिषद, नगरपरिषद शाळा, आश्रमशाळा आदींमधील रिक्त जागांचा आकडाही यात मोठी भर घालणार आहे. 

रिक्त जागांचा तपशील - मुख्याध्यापक : ०४- उपमुख्याध्यापक : ०१- अधीक्षक : १८- प्राथमिक शिक्षक : ४०- उच्च प्राथमिक शिक्षक : २२८- माध्यमिक शिक्षक : २३२

सात शाळांना बंदची नोटीस, तर सहा शाळांना ‘सेल्फफायनांन्स’ची नोटीसदरम्यान २०२२-२३ च्या यूडायस माहितीनुसार जिल्ह्यात सात शाळांमध्ये २० पेक्षा कमी पट संख्या आढळली आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळांना नोटीस बजावली असून शाळा बंद का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली आहे. ठराविक काळात समाधानकारक खुलास प्राप्त न झाल्यास या शाळा बंद करण्याची तंबीही देण्यात आली आहे. यामध्ये केळापूर तालुका, उमरखेड तालुका, वणी तालुक्यातील प्रत्येकी एका शाळेचा समावेश आहे. तर यवतमाळ तालुक्यातील चार शाळांचा समावेश आहे. तसेच निकषांचे पालन न करणाऱ्या सहा विनाअनुदानित शाळांना ‘स्वयंअर्थसहायित’ शाळा घोषित करण्याबाबतही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात राळेगाव तालुक्यातील दोन, पुसदमधील एक, मारेगावमधील एक आणि यवतमाळमधील दोन शाळांचा समावेश आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षण