शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ: विहिरीचे खोदकाम करताना आढळला भुयारी मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 18:39 IST

विहिरीचे खोदकाम करताना भुयारसदृश्य मार्ग आढळल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील प्राचीन गाव असलेल्या केळापूर येथे उघडकीस आली.

- नरेश मानकर

यवतमाळ : विहिरीचे खोदकाम करताना भुयारसदृश्य मार्ग आढळल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील प्राचीन गाव असलेल्या केळापूर येथे उघडकीस आली. हा मार्ग पांढरकवडा येथील गोपाळकृष्ण मंदिरापर्यंत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने याबाबत संशोधन करण्याची गरज निर्माण झाली.केळापूर हे अतिप्राचीन व ऐतिहासिक गाव आहे. येथे जगदंबा मातेचे पुरातन मंदिर आहे. प्राचीन काळी कुंतलापूर नावाने केळापूर ओळखले जायचे. तसेच पांडव अज्ञातवासात असताना येथे आश्रयाला असल्याचे सांगितले जाते. केज राजाची राजधानी असलेल्या केळापूर येथून पांढरकवडाच्या गोपाळकृष्ण मंदिरापर्यंत एक भूयारी मार्ग आणि वाई येथील चंडिका माता मंदिरापर्यंत दुसरा भुयारी मार्ग त्या काळी असल्याचा उल्लेख ‘वºहाडचा इतिहास’ या ग्रंथात आढळतो. केळापूर येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचे खोदकाम सुरू आहे. काही मजूर खोदकाम करताना त्यांना दोन आडवे मोठे खड्डे दिसले. त्यांनी पुन्हा खोदायला सुरुवात केली असता लांबपर्यंत आतमध्ये पूर्व भागाने भुयारसदृश्य जवळपास पाच फूट रुंदीचे खड्डे आढळून आले. ही माहिती गणेश अनमूलवार या तरुणाला मिळताच त्याने भुयारासारख्या दिसणाºया मार्गाने प्रवेश केला. आतमध्ये बºयाच लांबपर्यंत हा मार्ग आढळून आला. १० ते १५ फूट आत जावून समोर काळोख असल्याने व श्वास गुदमरल्याने तो परत आला. या प्रकाराची माहिती होताच अनेकांनी भेटी देऊन पाहणी केली. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, जगदंबा संस्थानचे माजी अध्यक्ष दीपक कापर्तीवार, डॉ.नीलेश परचाके, मदन जिड्डेवार, प्रेमराव वखरे, विजय पाटील आदींनी या स्थळाला भेट दिली.

पुरातत्त्व विभागाकडून संशोधनाची गरजकेळापूर येथे असलेला हा भूयारसदृश्य मार्ग हजारो वर्षांपूर्वीचा असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने संशोधन करण्याची गरज आहे. हे ऐतिहासिक रहस्य उलगडण्यासाठी पांढरकवडा येथील नागरिक पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करीत आहे.