शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ ‘एसटी’ आगार वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 20:58 IST

कधीकाळी उत्पन्नाच्या बाबतीत जिल्ह्यात अव्वल राहिलेले यवतमाळ ‘एसटी’ आगार आज सर्वात मागे गेले आहे. वरिष्ठांचे नियंत्रण सुटल्याने या आगाराचा कारभार ढेपाळला आहे. नादुरुस्त बसेसची वाढती संख्या, कामगारांचा तुटवडा आदी कारणांमुळे बसफेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देबसफेऱ्या रद्द : प्रमुख अधिकारी आजारी रजेवर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कधीकाळी उत्पन्नाच्या बाबतीत जिल्ह्यात अव्वल राहिलेले यवतमाळ ‘एसटी’ आगार आज सर्वात मागे गेले आहे. वरिष्ठांचे नियंत्रण सुटल्याने या आगाराचा कारभार ढेपाळला आहे. नादुरुस्त बसेसची वाढती संख्या, कामगारांचा तुटवडा आदी कारणांमुळे बसफेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच प्रमुख अधिकारी आजारी रजेवर गेले असल्याने हा आगार वाऱ्यावर आहे.प्रवाशांची सर्वाधिक गर्दी राहात असलेल्या अमरावती, नागपूर मार्गावर शिवशाही बसफेºया वाढविल्या. तिकीट दीडपट असल्याने बहुतांश प्रवासी या बसने प्रवास टाळतात. कमी तिकिटाच्या बसेस अर्धा ते एक तासाने फलाटावर लागतात. त्यातील बहुतांश बाहेरून येत असल्याने फुल्ल येतात. अशावेळी यवतमाळ बसस्थानकावरून चढणाºया प्रवाशांना स्टँडिंग प्रवास करावा लागतो. अमरावती, नागपूर मार्गावर लालपरी कमी झाल्यानेही प्रवासी एसटीपासून दूर चालला आहे.आगाराचे उत्पन्न घटण्यास हे एक मोठे कारण सांगितले जाते. तरीही त्यावर उपाययोजना होत नाही. आता तर या आगाराचे आणि बसस्थानकाचे अधिकारीच रजेवर गेलेले आहेत. आगार व्यवस्थापक, बसस्थानक प्रमुख रजेवर आहेत. वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक निरीक्षक प्रभारी आहेत. त्यांच्याकडून पूर्ण क्षमतेने जबाबदारी पार पाडली जात नाही. आगारात नादुरुस्त बसेस लवकर दुरुस्त केल्या जात नाही. कामगारांवर कुणाचाच वचक नसल्याने सोयीने काम सुरू आहे. आधीच बसचा तुटवडा आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील फेऱ्यांना बसत आहे. ऐन वेळेवर बस रद्द करून किंवा उशिरा पाठवून प्रवाशांना वेठीस धरले जात आहे.कर्मचारी अडचणीतबसेस वेळेवर उपलब्ध होत नाही. ऐनवेळी फेरी रद्द केली जाते. अशावेळी एसटी चालक, वाहकांपुढे ड्युटीचा प्रश्न निर्माण होतो. मार्गावर नेण्यास अयोग्य असलेल्या बसेसही पुरविल्या जातात. प्रवाशांना त्रास होईल, अशा बसेस चालकांनी मार्गावर नेऊ नये, असे नियम करून ठेवले आहे. प्रत्यक्षात आगारातूनच सुस्थितीतील बसेस उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. यवतमाळ आगारात कामगारांचे रजा अर्ज स्वीकारण्यासही टोलवाटोलवी केली जाते. जबाबदारी कुणीही स्वीकारण्यास तयार नाही. विभाग नियंत्रकांचेच नियंत्रण नसल्याची ओरड कामगारांमधून होत आहे.

टॅग्स :state transportएसटी