शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Yavatmal: यवतमाळात हिवरीच्या शेतकऱ्याचे शोले स्टाइल आंदोलन

By रूपेश उत्तरवार | Updated: January 5, 2024 19:16 IST

Yavatmal News: हिवरी येथील शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे या शेतकऱ्याच्या शेतात जाणारा रस्ता इतर शेतकऱ्यांनी अतिक्रमीत केला आहे. यामुळे पांडुरंगच्या शेतातील कापणीस आलेला ऊस गतवर्षी शेतकऱ्यांना नेताच आला नाही.

- रुपेश उत्तरवार यवतमाळ - हिवरी येथील शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे या शेतकऱ्याच्या शेतात जाणारा रस्ता इतर शेतकऱ्यांनी अतिक्रमीत केला आहे. यामुळे पांडुरंगच्या शेतातील कापणीस आलेला ऊस गतवर्षी शेतकऱ्यांना नेताच आला नाही. या प्रकरणात उमरखेड उपविभागीय अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईसह रस्ता तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मे महिन्यात दिले होते. मात्र त्याची पूर्तता झाली नाही. यावर्षी ऊस काढणीला आला आहे. यामुळे रस्त्याच्या मागणीसाठी पांडुरंगने टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले.

हिवरी येथील शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे या शेतकऱ्यांच्या शेतशिवारात जाण्यासाठी ४० फुटांचा पांदण रस्ता मंजूर आहे. या पांदण रस्त्याच्या एका बाजूला नाला आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी केवळ पाऊलवाट उरली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीस आलेला ऊस कारखान्यापर्यंत नेता येत नाही. गतवर्षी याच प्रकारामुळे शेतकऱ्यांचा अडीच एकरातील तीन लाखांचा ऊस शेतातच वाळला. यामुळे शेतकऱ्याने महागाव तहसीलसमोर मुलाबाळासह आंदोलन केले. यावेळी त्यांना पांदण रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन दिले. तहसीलदारांच्या आश्वासनानंतरही त्याची पूर्तता झाली नाही.

लोकशाहीदिनी असंख्य तक्रारी केल्या. इतकेच नव्हे तर १ जानेवारीपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची शासकीय यंत्रणेने दखल घेतली नाही. यामुळे पांडुरंगने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढून आंदोलन केले. रस्ता मोकळा करून द्यावा आणि गतवर्षी झालेली नुकसान भरपाई तत्काळ देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. रात्री उशिरापर्यंत शेतकरी टॉवरवरच बसून होता. शासकीय यंत्रणेकडून वारंवार विनंती झाली. मात्र शेतकऱ्याचे समाधान झाले नाही.अडीच तास आरडीसीकडे मात्र तोडगा नाहीदरम्यान या प्रकरणात वारकरी शेतकरी संघटनेचे सिकंदर शाह आणि शिष्टमंडळ आरडीसीच्या दालनात अडीच तास थांबले. मात्र त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न झाला नाही. असा आरोप शेतकरी वारकरी संघटनेने केला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीYavatmalयवतमाळ