Maharashtra Election 2019; यवतमाळात शिवसेना बंडखोराने नामांकनासाठी आणली दहा हजारांची चिल्लर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 01:40 PM2019-10-04T13:40:16+5:302019-10-04T13:40:49+5:30

यवतमाळ नगरपरिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक तथा बंडखोर उमेदवार गजानन इंगोले यांनी अनामत रक्कम म्हणून दहा हजार रुपयांची नाणी (चिल्लर) सादर केल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला.

In Yavatmal, Shiv Sena rebels bring ten thousand coins for nomination | Maharashtra Election 2019; यवतमाळात शिवसेना बंडखोराने नामांकनासाठी आणली दहा हजारांची चिल्लर

Maharashtra Election 2019; यवतमाळात शिवसेना बंडखोराने नामांकनासाठी आणली दहा हजारांची चिल्लर

Next
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांची दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शुक्रवारी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील एका दृश्याचा प्रत्यय आला. यवतमाळ नगरपरिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक तथा बंडखोर उमेदवार गजानन इंगोले यांनी नामांकन दाखल करण्यासाठी वाजतगाजत रॅली काढली. त्यानंतर ते नामांकन भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यांनी यावेळी अनामत रक्कम म्हणून दहा हजार रुपयांची नाणी (चिल्लर) सादर केल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. एक, दोन व पाच रुपयांचे कलदार मोजताना निवडणूक कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. अपक्ष उमेदवाराच्या या अजबगजब फंड्याची चांगलीच चर्चा आहे. गजानन इंगोले हे किराणा व्यावसायिक आहे. त्यातून जमलेली चिल्लर त्यांनी नामांकनासाठी सादर केली. ही चिल्लर आणल्याने निवडणूक विभागात अधिकाऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अनंत देऊळगावकर यांची चिडचिडही पाहायला मिळाली. मात्र गजानन इंगोले यांनी पैसा आहे घ्यावाच लागेल, अशी आग्रही भूमिका घेतली.

Web Title: In Yavatmal, Shiv Sena rebels bring ten thousand coins for nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.