शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

‘अंबे मात की जय’च्या घोषाने दणाणले यवतमाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 5:00 AM

माँ जगदंबेचा जयघोष, ढोलताशांचा गजर, फुलांची उधळन, रांगोळीने सजलेले रस्ते, नयनरम्य देखावे असे मनोहारी दृश्य रविवारी पहायला मिळाले. निमित्त होते घटस्थापनेचे. रविवारी पाहटेपासूनच यवतमाळ शहरात विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांचे जत्थे वाहनांमध्ये बसून येत होते. यामुळे संपूर्ण शहरात मंगलमय वातावरण अनुभवायला मिळाले.

ठळक मुद्देढोलताशा पथकाचे संचलन : विविध देखावे, वाद्य, प्रबोधनपर सुविचारांनी लक्ष वेधले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : माँ जगदंबेचा जयघोष, ढोलताशांचा गजर, फुलांची उधळन, रांगोळीने सजलेले रस्ते, नयनरम्य देखावे असे मनोहारी दृश्य रविवारी पहायला मिळाले. निमित्त होते घटस्थापनेचे. रविवारी पाहटेपासूनच यवतमाळ शहरात विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांचे जत्थे वाहनांमध्ये बसून येत होते. यामुळे संपूर्ण शहरात मंगलमय वातावरण अनुभवायला मिळाले.शहरातील लोखंडी पुल, माळीपुरा, पॉवर हाऊस, पिंपळगाव, वडगाव, वाघापूर, लोहारा, मोहा, भोसा यासह विविध भागात प्रचंड गर्दी पहायला मिळाली. माँ भवानीला सजविण्यासाठी लागणारे श्रृंगारसाहित्य खरेदी करण्यासाठी पहाटेपासूनच दुकानांमध्ये प्रचंड गर्दी होती. घटस्थापनेचा मुहूर्त लक्षात घेता मंडळांनी आपल्या सोयीनुसार माँ भवानीच्या मूर्तीची विधीवत पूजा करून प्रस्थान केले.स्थापनेसाठी जगदंबेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांची लक्षणीय गर्दी पहायला मिळाली. विविध भगवे फेटे बांधून, नऊवारी साडीत अनेक महिला मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या मदतीला वारकरी भजनी मंडळीही होती. परंपरागत आदिवासी नृत्य सादर करणारे कलावंतही या ठिकाणी पहायला मिळाले. तर काही मंडळांनी खेळांना प्राधान्य देत मल्लखांबावरचा व्यायामही यावेळी सादर केला.दुर्गोत्सव मंडळांचे ढोलताशा पथकही यावेळी पहायला मिळाले. परंपरागत बँड, अद्ययावत बँड पथक, ताशा आणि आॅर्केस्ट्रॉही यावेळी सोबत होता. सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या मंडळाने मातेच्या स्थापनेसाठी स्वतंत्र रथ बनविले होते. काहींनी मोराचा रथ बनविला, काहींनी फुलांचा रथ बनविला होता. काहींनी धान्यांची सजावट करीत संपूर्ण रथ तयार केला. स्थानिक कलावंतांनी बनविलेले हे रथ अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. या मिरवणुकीत वाघांची लुप्त पावणारी प्रजाती वाचविण्यासाठी तशी प्रतिकृतीही मंडळांनी सादर केली होती.मिरवणुकीच्या प्रारंभी काही मंडळांनी शिवराय आणि माँ जिजाऊची वेशभूषा केलेले कार्यकर्ते पहायला मिळाले. यामुळे घटस्थापनेची मिरवणूक ऐतिहासिक झाली. यावेळी ठिकठिकाणी भक्तांवर तोफेच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करण्यात आला. तर अनेक ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुकीचे स्वागत झाले.ग्रामीण भागातही माँ दुर्गेचा उत्सव होतो. हा उत्सव छोट्या स्वरूपाचा असतो. या छोट्या मंडळांना आर्र्थिक स्थितीनुसार साहित्य खरेदी करता यावे म्हणून स्थानिक पोस्टल ग्राउंडवर दुकाने लागली होती. या ठिकाणी मूर्तीपासून साज-साहित्यापर्यंतच्या विविध वस्तू होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत मिरवणुकांनी माहोल कायम ठेवला होता. दिवाळीपूर्वीच दिवाळी सारखे वातावरण होते.पोलिसांच्या कर्तव्याचा अभिमानसन, उत्सव आणि इतर कठीण प्रसंगी पोलीस कायदा व सुव्यवस्था सांभाळतात. जनसामान्याचे संरक्षण करतात. यामुळे पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दुर्गोत्सव मंडळांनी मिरवणुकीत बॅनरही ठिकाणी लावले होते.जिल्ह्यात २४०० मंडळेयावर्षी जिल्ह्यात २४०० मंडळे सार्वजनिक दुर्गोत्सव साजरा करणार आहे. यातील ६६९ मंडळे यवतमाळ शहरात उत्सव साजरा करीत आहे. १७७१ मंडळे ग्रामीण भागात उत्सव साजरा करणार आहे. ४५३ गावांमध्ये ‘एक गाव एक दुर्गा’ उपक्रम पार पडणार आहे. तर जिल्ह्यात ३२१ शारदा मंडळे आहेत.

टॅग्स :Navratriनवरात्री