शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Yavatmal: वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्याला अटक, साडेसहा कोटींच्या कामात अनियमितता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 20:45 IST

Yavatmal: यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत योजनेंतर्गत ३३ केव्हीचे एक्स्प्रेस फिडर बसविण्यात आले. या कामात अनियमितता झाल्याचा ठपका न्यायालयाच्या आदेशावरून ठेवण्यात आला.

यवतमाळ - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत योजनेंतर्गत ३३ केव्हीचे एक्स्प्रेस फिडर बसविण्यात आले. या कामात अनियमितता झाल्याचा ठपका न्यायालयाच्या आदेशावरून ठेवण्यात आला. या प्रकरणात कंत्राटदार व वीज वितरणचे अभियंते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाशी थेट संबंध असलेले तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय चितळे यांना आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी सकाळी अटक केली.

संजय चितळे यांना गुन्हे शाखेच्या पथकाने न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश केला. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत योजनेच्या कामावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यातच या योजनेवर वीजपुरवठा करण्यासाठी वीज वितरणाकडून ३३ केव्ही एक्स्प्रेस फिडरचे काम करण्यात आले. सहा कोटी ५४ लाखांच्या या कामात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला. माहिती अधिकारातून अजिंक्य पाटील यांनी हा अपहार बाहेर काढला. या प्रकरणात पात्रता नसणाऱ्या कंत्राटदारांना काम देण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. हा अपहाराचा मुद्दा थेट विधिमंडळात गाजला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कारवाईबाबत विचारणा केली. त्यानंतर, या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली.

न्यायालयाच्या आदेशाने झाला होता गुन्हा दाखलविधिमंडळापूर्वी न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणात तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय चितळे यांचा दोष असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यावरूनच कंत्राटदार अतुल आसरकर, प्रमोद डोंबळे, विजय दंडे यांच्यावरही कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७७, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक सुनील पाटील, मिलिंद गोफणे, दीपक आसरकर यांनी कार्यकारी अभियंत्याला अटक केली. न्यायालयापुढे हजर केले. अटक झालेले कार्यकारी अभियंता संजय चितळे हे सध्या हिंगोली येथे कार्यरत आहे. तेथे दोन उपविभागांचा प्रभार त्यांच्याकडे आहे. या कारवाईने वीज वितरणच्या वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ