शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात सर्वात गरीब जिल्हा ठरला यवतमाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 05:00 IST

२०११ ची जनगणना आणि २०१९-२० मध्ये झालेल्या कुटुंब आरोग्य सर्वेक्षणावरून नीती आयोगाने देशभरातील गरिबीचा निर्देशांक नुकताच जाहीर केला आहे. यात दर्शविण्यात आलेली गरिबी ही केवळ दरडोई उत्पन्नावर आधारित नाही. तर उपलब्ध घरे, वीज जोडण्या, पाण्याची व्यवस्था, स्वयंपाकाच्या इंधनाची व्यवस्था, आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सोयी, मृत्युदर अशा विविध निकषांच्या आधारावर हा ‘मल्टिडायमेन्शनल पॉव्हर्टी’ निर्देशांक निश्चित केला गेला आहे.

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकरी आत्महत्यांनी तळमळणारा यवतमाळ जिल्हा उद्योगविहीन आहे. त्यामुळेच येथील नागरिकांचे राहणीमान अत्यंंत खालावले आहे. मात्र जिल्ह्यातील ही गरिबी विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे शिक्कामोर्तब नीती आयोगाच्या अहवालाने केले आहे. जिल्ह्यातील तब्बल २३.५४ टक्के नागरिक गरीब असल्याचे या अहवालात नोंदविले गेले. त्यामुळे गरिबांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०११ ची जनगणना आणि २०१९-२० मध्ये झालेल्या कुटुंब आरोग्य सर्वेक्षणावरून नीती आयोगाने देशभरातील गरिबीचा निर्देशांक नुकताच जाहीर केला आहे. यात दर्शविण्यात आलेली गरिबी ही केवळ दरडोई उत्पन्नावर आधारित नाही. तर उपलब्ध घरे, वीज जोडण्या, पाण्याची व्यवस्था, स्वयंपाकाच्या इंधनाची व्यवस्था, आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सोयी, मृत्युदर अशा विविध निकषांच्या आधारावर हा ‘मल्टिडायमेन्शनल पॉव्हर्टी’ निर्देशांक निश्चित केला गेला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २३.५४ टक्के नागरिक या सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. त्यातही ग्रामीण क्षेत्रातील गरिबीचा निर्देशांक २२.८३ तर शहरी क्षेत्रातील गरिबीचा निर्देशांक केवळ ५.५५ इतका आहे. यावरून जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील नागरिक आजही मोठ्या प्रमाणात दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असल्याचे स्पष्ट होते. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात साडेतीन लाखांपेक्षा अधिक नागरिक दारिद्र्यरेषेखाली होते. मात्र निती आयोगाच्या ताज्या अहवालानुसार गेल्या दहा वर्षात बीपीएलमधील नागरिकांची संख्या कमी होण्याऐवजी वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात शाळा, दवाखाने, घरकूल, पाणीपुरवठा अशा विविध सोयी-सुविधांबाबत शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.  

 महाराष्ट्रात जिल्ह्याचा सहावा क्रमांक- सर्वाधिक गरीब नागरिक असलेला यवतमाळ हा विदर्भातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे. तर, महाराष्ट्रातील सहावा जिल्हा ठरला आहे. नंदुरबार, धुळे, जालना, हिंगोली आणि नांदेड या पाच जिल्ह्यांमध्ये यवतमाळपेक्षा गरिबीचा निर्देशांक जास्त आहे. 

 

टॅग्स :NIti Ayogनिती आयोग