शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

Yavatmal : कुख्यात राजेशला एमपीडीए, तर निखिलला केले हद्दपार

By विशाल सोनटक्के | Updated: December 23, 2023 15:02 IST

Yavatmal Crime News : यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू झाली आहे. या अंतर्गतच पुसद येथील कुख्यात राजेश उंटवाल याला एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असून त्याची रवानगी अकोला कारागृहात झाली आहे.

- विशाल सोनटक्के यवतमाळ : जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू झाली आहे. या अंतर्गतच पुसद येथील कुख्यात राजेश उंटवाल याला एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असून त्याची रवानगी अकोला कारागृहात झाली आहे. तर बाभूळगावातील निखिल दहाट याच्यावर एक वर्षाच्या हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

पुसदमधील मुखरे चौक येथे राहणाऱ्या राजेश दीपक उंटवाल याच्याविरूद्ध गंभीर दुखापत, विनयभंग, साथीदारांसह दंगा करणे, धमकी देणे, घरात घुसून मारहाण करणे तसेच जुगार खेळणे आदी गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे २०१८ पासून पुसद शहर तसेच ग्रामीण पोलिस ठाण्यात आहेत. त्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण केल्याने त्याच्याविरूद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला २१ डिसेंबर रोजी मंजुरी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेवून अकोला जिल्हा कारागृहात रवानगी केली.

तर बाभूळगाव हद्दीतील निखिल सुरेश दहाट याच्याविरूद्धही जबरी चोरीसह विनयभंगाचे गुन्हे २०१६ पासून होते. त्यानेही बाभूळगाव परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याने त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव बाभूळगाव पोलिस ठाण्याकडून यवतमाळच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर निखिल दहाट याची यवतमाळ जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपारी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने, पुसद शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर, बाभूळगावचे पोलिस निरीक्षक सुनील हुड आदींच्या नेतृत्त्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ