शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
3
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
4
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
5
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
6
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
7
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
8
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
9
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
10
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
11
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
12
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
13
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
14
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
15
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
16
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
17
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
18
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
19
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
20
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

यवतमाळ ‘मेडिकल’चे रेमडेसिविर काळ्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 5:00 AM

शासकीय काेविड रुग्णालयात पावडर स्वरूपात रेमडेसिविर इंजेक्शन येते. त्यात लिक्विड मिसळून ते व्हायल तयार केले जाते. शिवाय यातील मुख्य आराेपी साैरभ माेगरकर याने कबुली दिल्यावरून शासकीय काेविड रुग्णालयात कार्यतर असलेल्या पूनम  चाेखाराम मेश्राम या कंत्राटी परिचारिकेला पाेलिसांनी  रविवारी ताब्यात घेतले.  तिच्याकडून आणखी काय माहिती मिळते याचा शाेध पाेलीस घेत आहे.

ठळक मुद्देकंत्राटी नर्स ताब्यात : जप्त केलेले तीन व्हायल शासकीय पुरवठ्यातील, नागपूरमधून आलेल्या सहा व्हायलवरही लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जप्त केलेल्या रेमडेसिविरच्या नऊ व्हायलपैकी तीन व्हायल शासकीय काेविड रुग्णालयातील असल्याचे निष्पन्न झाले. रुग्णाला देण्यासाठी असलेले इंजेक्शन थेट काळ्या बाजारात विक्री हाेत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू हाेती. पाेलीस कारवाईने हा प्रकार उघड झाला आहे. यात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शासकीय काेविड रुग्णालयात कार्यरत असलेल्या आणखी एका कंत्राटी परिचारिकेला पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. शासकीय काेविड रुग्णालयात पावडर स्वरूपात रेमडेसिविर इंजेक्शन येते. त्यात लिक्विड मिसळून ते व्हायल तयार केले जाते. शिवाय यातील मुख्य आराेपी साैरभ माेगरकर याने कबुली दिल्यावरून शासकीय काेविड रुग्णालयात कार्यतर असलेल्या पूनम  चाेखाराम मेश्राम या कंत्राटी परिचारिकेला पाेलिसांनी  रविवारी ताब्यात घेतले.  तिच्याकडून आणखी काय माहिती मिळते याचा शाेध पाेलीस घेत आहे. कोरोना महामारीच्या संकटात सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी शासकीय कोविड रुग्णालयाचाच आधार घेतो. मोठ्या विश्वासाने रुग्णाचे नातेवाईकही रुग्णाला तेथे दाखल करतात. उपचार सुरू असेपर्यंत रुग्ण व त्याचे नातेवाईक यांच्यात संवादही होत नाही. अशा विश्वासाला तडा देण्याचे काम रेमडेसिविर व्हायल चोरी प्रकरणातून झाले आहे. अडचणीच्या काळात दानदात्यांनी रुग्णांचा जीव वाचावा यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनसाठी मदतीचा हात दिला होता. मात्र रुग्णालयातील अंतर्गत यंत्रणेत काही महाभाग असे माणुसकीला काळीमा फासण्याचे काम करत असल्याचे उघड झाले आहे. रुग्णांचा अत्यावश्यक डोस त्याला न देता त्याची बाजारात विक्री करणे हा गंभीर प्रकार उघड झाला आहे. अटक केलेल्या नर्सने १५ व्हायलची कबुली पोलिसांकडे दिल्याची माहिती आहे.

शासकीय रुग्णालयातील मृत्यूचे गूढ उकललेशासकीय काेविड रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचा दर सर्वाधिक आहे. याबाबत वारंवार जिल्हाधिकारी यांच्याकडून विचारणा झाली.  प्रत्येक वेळी वेगवेगळे उत्तर दिले जात हाेते.  दाखल रुग्णांना आवश्यक औषधाचे डाेस न देता त्याची काळ्या बाजारात विक्री केली जाते. त्यामुळेच काेविड रुग्णांच्या मृत्यूचा  दर वाढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  रुग्णालय प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने असे गंभीर प्रकार येथे हाेत आहेत.

तीन आराेपी पाेलीस काेठडीत 

पाेलिसांनी अटक केलेल्या पाच आराेपींना रविवारी न्यायालयात हजर केले. यात डाॅ. अक्षय तुंडलवार, सावन पवार, साैरभ माेगरकर या तिघांना न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली, तर बिलकीस बानाे  व तिची गर्भवती मुलगी शबाना अन्सारी यांची न्यायालयीन काेठडीत रवानगी केली. तपास अधिकारी सहायक पाेलीस निरीक्षक गजानन करेवाड यांनी आराेपींचा तीन दिवसांचा रिमांड मागितला हाेता. 

 

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरhospitalहॉस्पिटल