शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात चार बालविवाह रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:37 IST

यवतमाळ जिल्ह्यात होणारे चार बालविवाह रोखण्यात जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश आले. पालकांचे आणि नातेवाईकांचे समुपदेशन करून बालविवाहपासून त्यांना परावृत्त केले.

ठळक मुद्देबाल संरक्षण कक्ष नातेवाईकांचे समुपदेशन

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अज्ञान, रुढी परंपरा आदी कारणांनी बालविवाहाची कुप्रथा आजही काही भागात सुरू आहे. शासन बालविवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी छुप्या पद्धतीने असे विवाह होत आहे. असेच यवतमाळ जिल्ह्यात होणारे चार बालविवाह रोखण्यात जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश आले. पालकांचे आणि नातेवाईकांचे समुपदेशन करून बालविवाहपासून त्यांना परावृत्त केले.जिल्ह्यातील पिसगाव (मारेगाव), हेगडी (पुसद), भंडारी (आर्णी) आणि सावंगा (दिग्रस) येथे होऊ घातलेले बालविवाह पालकांचे मन वळवून थांबविण्यात आले. यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचीही मदत घेण्यात आली. १८ वर्षाखालील मुलीचा आणि २१ वर्षातील मुलाचा विवाह करण्यास कायद्याने प्रतिबंध आहे. मात्र आजही काही समाजात बालविवाह करण्याची प्रथा कायम आहे. अज्ञान, रुढी परंपरा, अंधश्रद्धा आणि जोखीम यातून बालपणीच विवाह उरकले जातात. भटकंती करणाऱ्या समाजात मुलगी वयात आली की, तिचा विवाह उरकण्याची घाई होते. १३-१४ वर्षाची कोवळी पोरं विवाह बंधनात अडकून १६-१७ व्या वर्षी तिच्यावर मातृत्वही लादले जाते. अनेक कोवळ्या कळ्या अशा विवाहाने निस्तेज झाल्या आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी आणि बालविवाह रोखण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्षाने यासाठी प्रयत्न करीत आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथे होऊ घातलेला बालविवाह स्थानिक प्रशासन आणि कक्षाने रोखला. तसेच पुसद तालुक्यातील हेगडी, आर्णी तालुक्यातील भंडारी आणि दिग्रस तालुक्यातील सावंगा येथे होऊ घातलेले बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

समुपदेशनात लागतो कसबालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली की, बालसंरक्षण कक्षाचे अधिकारी त्या गावात पोहोचतात. कुटुंबातील आई-वडील, आजी-आजोबा यांची समजूत काढतात. परंतु वर्षानुवर्षे असलेला पगडा जायला कठीण जाते. समुपदेशकांचाही कस लागतो. अनेकदा पोलिसी खाक्या आणि भीती दाखवून हा विवाह रोखला जातो. तसेच यानंतर बालविवाह करणार नाही, असे हमीपत्रही लिहून घेतले जाते.प्रगतीशील महाराष्ट्रात बालविवाह होणे ही शरमेची बाब आहे. शासन असे विवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. चाईल्ड लाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे माहिती प्राप्त होताच पडताळणी करून खात्री केली जाते. त्यानंतर त्या कुटुंबाचे समूपदेशन करून हा विवाह रोखला जातो. असे विवाह होत असल्यास जागरुक नागरिकांनी जिल्हा बाल संरक्षण समिती अथवा चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.- रवी आडेजिल्हा बालसंरक्षण अधिकारी, यवतमाळ.

टॅग्स :Crimeगुन्हा