शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 07:20 IST

Kedarnath helicopter crash News: उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरातून भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी पहाटे गौरीकुंडच्या जंगलात शून्य दृश्यमानतेमुळे कोसळले

उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरातून भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी पहाटे गौरीकुंडच्या जंगलात शून्य दृश्यमानतेमुळे कोसळले असून, या अपघातात महाराष्ट्रातील तिघांसह सात जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर राज्यातील चारधामची हेलिकॉप्टर सेवा सोमवारपर्यंत बंद करण्यात आली. केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात वणी शहरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजकुमार सुरेश जयस्वाल (४१), त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल (३६) व मुलगी काशी जयस्वाल (२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत राजकुमार यांची दोन्ही मुले त्यांच्यासोबत गेली नव्हती. त्यामुळे ते या दुर्घटनेतून बचावले.

राजकुमार यांची पत्नी श्रद्धा यांचा १० जून रोजी वाढदिवस होता. या निमित्ताने देवदर्शनासाठी ९ जूनला राजकुमार, श्रद्धा व त्यांची मुलगी काशी हे तिघे तसेच राजकुमार यांचे साडभाऊ व त्याची पत्नी असे पाचजण केदारनाथ येथे गेले होते. राजकुमार व त्यांचे कुटुंबीय एका हेलिकॉप्टरमध्ये तर साडभाऊ व त्याची पत्नी दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये बसले होते. ज्या हेलिकॉप्टरमध्ये नातलग होते, ते हेलिकॉप्टर सुखरूप पोहचले. मात्र, दीड तास उलटूनही राजकुमार यांचे हेलिकॉप्टर ठरलेल्या ठिकाणी पोहचले नाही. त्यानंतर काही वेळातच अपघाताची बातमी पुढे आली, अशी माहिती मृत श्रद्धाचे काका राजू बोरेले यांनी माध्यमांना दिली.

कसा झाला अपघात?रुद्रप्रयाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, खराब हवामानामुळे व शून्य दृश्यमानतेमुळे खासगी कंपनी आर्यन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवले जाणारे हेलिकॉप्टर गौरीकुंड व केदारघाटीच्या त्रिजुगीनारायणजवळ कोसळले. त्यानंतर त्याला आग लागली. मृतांमध्ये बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे सदस्य विक्रम सिंह रावत यांचाही समावेश आहे.

पहाटे ५:१० : हेलिकॉप्टरचे गुप्तकाशी येथून उड्डाण.पहाटे ५:१८ : श्री केदारनाथजी हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरले.पहाटे ५:१९ : हेलिकॉप्टरचे गुप्तकाशीकडे उड्डाण.पहाटे ५:३० ते ५:४५ : हेलिकॉप्टर गौरीकुंडजवळ कोसळले.

काही वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीचा मृत्यूराजकुमार यांची पहिली पत्नी एकता यांचा काही वर्षांपूर्वी बाथरूममध्ये पडून मृत्यू झाला होता. त्यांना आरव आणि विवान ही दोन मुले आहेत. त्यानंतर राजकुमार यांनी पांढरकवडा येथील बोरले कुटुंबातील श्रद्धाशी दुसरे लग्न केले. त्यांना एक मुलगी होती.

टॅग्स :Helicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाMaharashtraमहाराष्ट्रYavatmalयवतमाळ