शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

यवतमाळच्या अभियंत्याने साकारले बहुपयोगी व्हेंटिलेटर, केंद्र सरकारचीही मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 07:26 IST

multi-purpose ventilator : या व्हेंटिलेटरमुळे ग्रामीण भागातील अपघाती मृत्यूचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी करता येऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.

यवतमाळ : ग्रामीण भागात अपघातग्रस्त रुग्णांना व इतर आजाराच्या रुग्णांना गोल्डन अवरमध्ये जीवनरक्षक प्रणाली उपलब्ध होत नाही. हे डोळ्यासमोर ठेवून यवतमाळमधील अभियंत्याने बहुपयोगी तसेच कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे. यासाठी केंद्र सरकारची मान्यताही मिळाली आहे. या व्हेंटिलेटरमुळे ग्रामीण भागातील अपघाती मृत्यूचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी करता येऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.

आकाश सूर्यकांत गड्डमवार या युवा अभियंत्याने हे बहुपयोगी व्हेंटिलेटर तयार केले आहे. मेकॅनिकलमध्ये एम.टेक असणाऱ्या आकाशने यासाठी २०१९ पासून संशोधन सुरू केले होते. सुरुवातीला त्याने प्रायोगिक तत्त्वावर दोन व्हेंटिलेटर तयार केले. यात त्याला जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकीतील प्रा. डॉ. सागर गड्डमवार यांनी सहकार्य केले. यानंतर पीजीआयएमईआर चंदीगड या संस्थेच्या बधिरीकरण विभागातील डॉ. राजू चव्हाण यांनी आकाशच्या संशोधनाची दखल घेतली. त्यांच्या मार्गदर्शनात परिपूर्ण असा व्हेंटिलेटर तयार करण्यात आला. त्यानतंर गायरो ड्राईव्ह मशीनरी प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातून उत्पादन सुरू करण्यात आले आहे.

व्हेंटिलेटर तयार करून त्याला आयएसओची मान्यता मिळवण्यात आली असून, त्याचे पेटंटही घेण्यात आले आहे. त्यावर चार संशोधन पेपर प्रसिद्ध केले आहे. आता या व्हेंटिलेटरला बांगलादेश, युगांडा, टांझानिया यासारख्या विकसनशील राष्ट्रांकडून मागणी होत आहे.

अशी आहेत वैशिष्ट्ये- अगदी सहा किलो वजनाचा व लिथियम बॅटरीवर चालणारे व्हेंटिलेटर- सायकल, दुचाकीवरही सहज वापरात येतो- गरज पडल्यास ऑक्सिजन जोडण्याचीही सुविधा- प्रसंगी हवेतील ऑक्सिजनवरही हे व्हेंटिलेटर रुग्णाला कृत्रिम श्वास देऊ शकते- हाताळण्यास सहज व सोपे आहे.

ग्रामीण भागातील अभियंते आपल्या परिस्थितीचा विचार करून संशोधन करण्यास पुढे येत नाहीत. उलट समाजाला कशाची गरज आहे, याची जाण ग्रामीण भागातील अभियंत्याकडे असते. आमच्या संशोधनामुळे ग्रामीण भागातील अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकते.- आकाश सूर्यकांत गड्डमवार, अभियंता

टॅग्स :Yavatmalयवतमाळ