शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात वीज जोडणी नसताना शेतक-याला आले २६ हजारांचे बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 13:37 IST

वीज जोडणीच्या प्रतीक्षेत चार वर्षापासून असलेल्या एका शेतकऱ्याला वीज जोडणी तर मिळालीच नाही उलट वीज वितरण कंपनीने त्यांना चक्क २६ हजार रुपयाचे वीज बिल पाठविले.

ठळक मुद्देवीज वितरणचा कारभारशेतकऱ्याचे डोळे पांढरे

हरिओम बघेल ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज जोडणीच्या प्रतीक्षेत चार वर्षापासून असलेल्या एका शेतकऱ्याला वीज जोडणी तर मिळालीच नाही उलट वीज वितरण कंपनीने त्यांना चक्क २६ हजार रुपयाचे वीज बिल पाठविले. वीज पुरवठा नसताना आलेले बिल पाहून आर्णी तालुक्यातील कोपरा येथील शेतकऱ्याचे डोळे पांढरे झाले आहे.अंबादास श्रीराम खापरकर असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचे कोपरा शिवारात शेत आहे. सिंचनासाठी त्यांनी आपल्या शेतात बोअरवेल खोदली. त्यानंतर वीज वितरण कंपनीकडे जोडणीसाठी रितसर अर्ज केला. ३ जानेवारी २०१३ रोजी वीज वितरणकडे डिमांड भरले. शेतात वीज जोडणीसाठी पाच खांब लावावे लागतील असे कारण सांगून जोडणी दिली नाही. मात्र आता वीज वितरण कंपनीने त्यांना तब्बल २६ हजार ४० रुपयाचे बिल पाठवून दिले.वीज बिल पाहून शेतकरी हैराण झाला. त्यांनी वीज वितरणचे कनिष्ठ अभियंता मुकेश गुल्हाने यांच्याशी संपर्क साधला. मी नवीन आहे, मला काहीच माहित नाही, चौकशी करून सांगतो असे ठेवणीतील उत्तर दिले. आपल्याकडे विजच नाही तर बिल भरायचे कसे असा सवाल ते करीत आहे. अंबादासकडे दोन एकर शेती असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह आहे. सिंचनातून हिरवे स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्याची वीज वितरण कंपनीने मात्र थट्टा चालविली आहे.

वीज जोडणीसाठी धडपडअंबादास खापरकर आपल्या शेतात वीज जोडणी मिळावी म्हणून वीज वितरणचे उंबरठे झिजवत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधिनाही त्यांनी याबाबत माहिती दिली.परंतु चार वर्षापासून वीज जोडणी मिळाली नाही. त्यांच्या नावावरील वीज जोडणी दुसऱ्याला तर दिली नाहीना त्यामुळे बिल तर आले नसावेना अशी शंका व्यक्त होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी