शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सीडीआर चोरी प्रकरणी यवतमाळ सायबर सेलच्या पोलिसाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:41 IST

राज्यभर गाजत असलेल्या एसडीआर व सीडीआर डाटा खासगी गुप्तहेराला पुरविल्याच्या प्रकरणात यवतमाळ सायबर सेलमध्ये कार्यरत पोलीस शिपायाला ठाणे क्राईम ब्रँचने गुरुवारी अटक केली.

ठळक मुद्देखासगी गुप्तहेरांना डाटा पुरविल्याचे उघड

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभर गाजत असलेल्या एसडीआर व सीडीआर डाटा खासगी गुप्तहेराला पुरविल्याच्या प्रकरणात यवतमाळ सायबर सेलमध्ये कार्यरत पोलीस शिपायाला ठाणे क्राईम ब्रँचने गुरुवारी अटक केली. विशेष म्हणजे या प्रकरणात यापूर्वी अटकेत असलेला यवतमाळातील अजिंक्य नागरगोजे याला या शिपायाने डाटा पुरविल्याचे तपासात पुढे आल्याने ही कारवाई करण्यात आली.नितीन खवडे (बक्कल नंबर २३४३) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. मागील अडीच वर्षापासून तो सायबर सेलमध्ये कार्यरत होता.खासगी गुप्तहेराला डाटा विक्री करण्याच्या गुन्ह्यात ठाणे पोलिसांनी यवतमाळातील अजिंक्य नागरगोजे याला अटक केली. अजिंक्यने यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांचा मेलआयडी व पासवर्ड वापरून हा डाटा मिळविल्याचे सुरूवातीला सांगण्यात येत होते. मात्र या गुन्ह्याचा ठाणे क्राईम ब्रँचकडून तपास सुरू होता.त्यासाठी यवतमाळ सायबर सेलच्या शिपायांना सलग दोन वेळा चौकशी करता ठाणे येथे पाचारण करण्यात आले. पोलीसांच्या चौकशीत अजिंक्य नागरगोजे याने खासगी गुप्तहेर रजनी पंडीत हिला विकलेला डाटा हा सायबर सेल मध्ये कार्यरत असलेला शिपाई नितीन खवडे याच्या आयडीवरून ट्रान्झीक्शन केल्याचे स्पष्ट झाले.यावरून नितीनला पुन्हा बुधवारी चौकशी करता बोलावून ठाणे पोलिसांनी अटक केली. अजिंक्य नागरगोजे हा इथीकल हॅकर म्हणून यवतमाळ पोेलिसांसाठी काम करत होता.याच काळात त्याची सायबर सेल मध्ये उठबस होती. नितीन खवडे याच्याशी त्याचा संबध आला आणि नितीने काही प्रतिष्ठांच्या मोबाईचा एसडीआर-सीडीआर अजिंक्यकडे फारवर्ड केला. ही लिंक ओपन झाली आहे.खासगी गुप्तहेराने यवतमाळातील प्रतिष्ठीतांचा डाटा का मागविला. त्यासाठी कोणी डिमांड केली. याचा देखिल शोध ठाणे क्राईम ब्राँच घेणार आहे. पोलीस दलातील फितूरा शिवाय डाटा बाहेर जाणे शक्य नाही, असे सुरूवातीपासूनच सांगण्यात येत होते.

टॅग्स :Crimeगुन्हा