शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ ग्राहक आयोगाचा एसबीआय इन्शुरन्सला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:20 IST

Yavatmal : सर्वेक्षण अहवाल पुरेसा; त्या आधारे भरपाई द्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कागदपत्र नसले तरी सर्वेक्षण अहवाल आहे, त्यामुळे त्याच आधारावर भरपाई द्यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने दिला आहे. या निर्णयामुळे एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीला चपराक बसली असून, विम्याची संरक्षित रक्कम ८ लाख ४१ हजार ७६० रुपये अदा करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

पुसद येथील अर्चना सतीश रहांगडाले यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. त्यांनी एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लि. नागपूरकडे भरपाईसाठी दावा दाखल केला. मात्र, कंपनीने मागितलेली कागदपत्रे सादर न केल्याचे कारण देत भरपाई नाकारली आणि प्रकरण बंद केले. आयोगाने मात्र सर्वेक्षण अहवाल पुरेसा असल्याचे नमूद करत विमा कंपनीला संपूर्ण भरपाई अदा करण्याचे आदेश दिले.

ग्राहक आयोगात तक्रारएसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीने दावा नाकारल्यामुळे अर्चना रहांगडाले यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली. अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे, सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान कंपनीने आपली बाजू मांडताना, तक्रारकर्त्यांनी कागदपत्र सादर केले नाही. तांत्रिक कारणामुळे विमा दावा बंद करण्यात आला, असा युक्तिवाद करण्यात आला. ही बाब अनुचित व्यापार प्रथा ठरते, असे आयोगाने नमूद केले.

अंतरिम अहवाल ठरला महत्त्वाचाएसबीआय जनरल इन्शुरन्सच्या सर्वेक्षकांनी अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केल्यानंतर अंतरिम अहवाल तयार केला असेल यानुसार देय असलेली रक्कम अदा करणे गरजेचे होते. परंतु विरुद्ध पक्षाने तसे काहीही केले नाही. त्यांचा विमा दावा फेटाळून ग्राहक म्हणून सेवा देण्यात कसूर केला, असे आयोगाने आपल्या निकालपत्रात नमूद केले आहे.

संरक्षित रक्कम द्यावीअपघातग्रस्त चारचाकी वाहनाचा दुरुस्ती खर्च कंपनीकडून २४ लाख ४५ हजार ८६४ रुपये सांगण्यात आला होता. मात्र, संरक्षित रक्कम आठ लाख ४१ हजार ७६० रुपये आहे. ही संपूर्ण रक्कम अर्चना रहांगडाले यांना देण्यात यावी, असा आदेश एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीला आयोगाने दिला आहे. कंपनीने मागितलेले कागदपत्र दिले नाही म्हणून तक्रारकर्त्यांना शारीरिक, मानसिक त्रासाची रक्कम मंजूर करणे योग्य ठरणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ