शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ शहरात गुंडांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 21:59 IST

पाठोपाठ घडणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यांमुळे यवतमाळ शहर गुंडांच्या हवाली झाले की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यातूनच नागरिकांमध्ये गुंडांची दहशत निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकायदा व सुव्यवस्था ऐरणीवर : जिल्ह्यात दीड महिन्यांत नऊ खून, गुन्हेगारी टोळ््यांना राजकीय आश्रय

राजेश निस्ताने ।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : पाठोपाठ घडणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यांमुळे यवतमाळ शहर गुंडांच्या हवाली झाले की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यातूनच नागरिकांमध्ये गुंडांची दहशत निर्माण झाली आहे. गुंडांच्या कारवाया आणि पोलिसांची बघ्याची भूमिका यामुळे कायदा व सुव्यवस्था ऐरणीवर आली आहे.यवतमाळ शहर संघटित गुन्हेगारीसाठी ओळखले जाते. लहान-मोठ्या टोळ्या, त्यातून होणाऱ्या वर्चस्वाच्या लढाया, खून, मारामाºया, घातक शस्त्रांचे साठे, अवैध सावकारी, व्याजाची वसुली, बाजारपेठेतील खंडणी वसुली, घरे-दुकाने खाली करण्यासाठी निर्माण केली जाणारी दहशत अशा कारवाया या टोळ्यांकडून चालविल्या जातात. त्यातच आता विरोधी टोळीचे संपलेले आव्हान, खुला राजकीय आशीर्वाद, प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे या गुन्हेगारी टोळ्यांची हिंमत चांगलीच वाढली आहे. एकेकाळी एका विशिष्ट क्षेत्रापर्यंतच मर्यादित असलेल्या या गुन्हेगारी टोळ्यांनी आता संपूर्ण यवतमाळ शहर कवेत घेतले आहे. हे शहर जणू गुन्हेगारी टोळ्यांच्या सावटात असल्याच्या प्रतिक्रिया चौकाचौकातून ऐकायला मिळत आहेत. या टोळ्यांना कुणाचाच अटकाव राहिलेला नाही.कायदा व सुव्यवस्था राखण्याची, नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडूनच लगाम घातला जात नसल्याने गुंडांचा धुमाकूळ वाढला आहे. यवतमाळ शहरात तलवार, चाकू या शस्त्रांचा वापर जणू नित्याचा झाला आहे. अनेकदा त्यात अग्निशस्त्रांचाही वापर होतो. त्यातूनच रक्तपात घडतो.१५ दिवसांत नऊ खूनसन २०१८ मध्ये गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यात आतापर्यंत खुनाच्या नऊ घटना घडल्या आहेत. जानेवारीमध्ये पाच तर फेब्रुवारीमध्ये १५ दिवसातच चार खून झाले आहे. २०१७ मध्ये १२ महिन्यांत खुनाच्या ५४ घटनांची नोंद आहे. या खुनांमागे वरवर कारणे वेगळी दिसत असली तरी त्यातील अनेक घटनांचे मूळ मात्र गुन्हेगारीतच दडले आहे.ट्रिपल सीट वाहनांचा धुमाकूळगुन्हेगारी टोळ्यांचे सदस्य शहरभर प्रचंड ध्वनी प्रदूषण करणारी दुचाकी वाहने घेऊन फिरतात. त्यावर ट्रिपल सिट असतात. या वाहनांना क्रमांकाचा पत्ता नसतो. त्याऐवजी विशिष्ट ‘सिम्बॉल’ लिहून आपल्या गुन्हेगारी टोळीची ओळख सांगण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्हा वाहतूक शाखा प्रमुखांनी यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्था व पार्किंगला बऱ्यापैकी शिस्त लावली आहे. त्याबाबत जनतेतून समाधानही व्यक्त होत आहे. आता शहरातून कर्णकर्कश हॉर्न वाजवत सुसाट धावणाºया या ट्रिपल सिट वाहनांना नियंत्रित करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. शहरात ट्रिपल सीट आणि विना क्रमांकाची फिरणारी वाहने वाहतूक पोलिसांची भीती संपल्याचे संकेत देत आहेत.कोचिंग क्लासेस बाहेर टवाळखोरांची गर्दीअशीच स्थिती कोचिंग क्लासेस परिसरातही पहायला मिळते. नेमके शिकवणी वर्ग सुटण्याच्या वेळीच टवाळखोरांची बाहेर गर्दी असते. चार-दोन अपवाद वगळता बहुतांश कोचिंग क्लासेस संचालकांकडून या गंभीरबाबीकडे लक्ष दिले जात नाही. आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नाही, अनेक ठिकाणी सिक्युरीटी गार्ड, सीसीटीव्ही कॅमेरे याचाही पत्ता नाही. अशा कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.पालकही असतात ‘सज्ज’गुन्हेगारी टोळीचे सदस्य व टवाळखोर युवकांचा वावर पाहता पालक वर्गही कायम चिंतेत असतो. अनेकदा पालक स्वत: मुलांना नेणे-आणणे करतात. तर गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व असलेल्या भागात शाळा-महाविद्यालये असतील तर अनेक पालक ‘आर-पार’ करण्यासाठी स्वत:ही ‘पुरेशा तयारी’ने सज्ज असतात, अशी माहिती आहे.कायदा हाती घेतला जाण्याची भीतीयातूनच एखादवेळी मोठा भडका उडण्याची, भविष्यात महिला-विद्यार्थिनी-पालक स्वत:च कायदा हातात घेण्याची व छेडखानी करणाºयांचा ‘अक्कू यादव’ करण्याची शक्यता नाकारता येत नाही.गुंडांना धडा शिकविणार कोण?अनेक पोलीस अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या पायाशी आहेत आणि या सत्ताधाऱ्यांचे गुंडांना खुले अभय आहे. त्यामुळे कायदेशीर व पारदर्शकपणे धडक कारवाई करण्याची हिंमत पोलिसात दिसत नाही. नेमक्या याच कारणावरुन यवतमाळ शहरात प्रचंड गुन्हेगारी वाढली असून दरआठवड्यातच कुणाचा ना कुणाचा मुडदा पडतो आहे. प्रशासनाची बोटचेपी भूमिका, राजकीय आश्रय यामुळेच गुंडांचे फावते आहे. त्यातूनच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.महिला-विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्नशाळा-महाविद्यालये सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी या संस्थांपुढे तसेच लगतच्या चौकांमध्ये टवाळखोर युवकांची गर्दी पाहायला मिळते. त्यात बहुतांश गुन्हेगारी टोळ्यांचेच ट्रिपल सीट सदस्य असतात. विद्यार्थिनीच नव्हे तर अनेकदा शिक्षिका, महिलांंनाही या टोळ्यांच्या छेडखानीचा सामना करावा लागतो.पोलीस अधिकारी नेत्यांच्या दारात‘वाढता राजकीय हस्तक्षेप’ हे कारण पोलिसांकडून गुन्हेगारीसाठी पुढे केले जाते. त्यात बरेच वास्तवही आहे. मात्र पोलिसांची राजकीय नेत्यांशी असलेली जवळीक, उठबससुध्दा तेवढीच कारणीभूत ठरते. अनेक पोलीस अधिकारी वरकमाईच्या पोस्टींगसाठी नेत्यांचे पाय धरतात. त्यामुळे पुढे आयुष्यभर सदर अधिकाऱ्याला त्या नेत्यापुढे मान वर करण्याची सोय राहत नाही.

टॅग्स :Crimeगुन्हा