लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : इंधन बचतीत उत्कृष्ट कार्याबद्दल एसटी महामंडळाच्या यवतमाळ आगाराने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे. सन २०१९ मधील या कार्याबद्दल मुंबई येथील सोहळ्यात आगार व्यवस्थापक (व) रमेश उईके यांना सन्मानित करण्यात आले. ५० हजार रुपये रोख आणि पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकासमंत्री छगन भुजबळ, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते उईके यांचा गौरव करण्यात आला. दरम्यान, यवतमाळ आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे.इंधन बचत कार्यक्रम यवतमाळ आगारात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी यंत्र अभियंता (चालन) अविनाश राजगुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहायक मोटर वाहन निरीक्षक जावेद खाँ पठाण, पवन पोटदुखे, प्रशिक पांडे आदी उपस्थित होते. सन २०१९ मध्ये इंधन बचतीच्या उत्कृष्ट कार्याबद्दल चालकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सहायक कामगार अधिकारी कपिल साळवे, एस.टी. मामीडवार, वाहतूक निरीक्षक गणेश गावंडे, सहायक वाहतूक निरीक्षक प्राजक्ता पाटील, इंधन लिपिक म्हणून काम सांभाळणारे अमन मांडवगडे, चंद्रशेखर गावंडे, सरोज गंभिरे, पूजा राव, नयन फरकुंडे आदी उपस्थित होते. संचालन व आभार अशोक दिघाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी अविश जरूदे, वाय.पी. काळबांडे, प्रवीण बुटले आदींनी पुढाकार घेतला.
इंधन बचतीत यवतमाळ आगार तिसरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST
महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकासमंत्री छगन भुजबळ, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते उईके यांचा गौरव करण्यात आला. दरम्यान, यवतमाळ आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे.
इंधन बचतीत यवतमाळ आगार तिसरे
ठळक मुद्देमुंबई येथे गौरव : ५० हजारांचे रोख बक्षीस, इंधन बचत मासिक कार्यक्रमाला सुरुवात