शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

खेड्यातील निराधार वृद्धांसाठी तरुणांचे वात्सल्य भोजनालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:59 PM

मुलं सोडून गेली, कुणाला मुलंच नाहीत, कुणाला आहे पण पोसायला तयार नाहीत... मुंबई-पुण्यासारख्या शहरातच नव्हे, अशी एकाकी म्हातारी मंडळी खेड्यापाड्यातही आहे. अगदी आपल्या जिल्ह्यातल्या पार्डीनस्करी नावाच्या पाच पन्नास घरांच्या गावातही ही स्थिती आहे.

ठळक मुद्देघाटंजी तालुका : १९ आजी-आजोबांच्या आसऱ्याची सोमवारी वर्षपूर्ती

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुलं सोडून गेली, कुणाला मुलंच नाहीत, कुणाला आहे पण पोसायला तयार नाहीत... मुंबई-पुण्यासारख्या शहरातच नव्हे, अशी एकाकी म्हातारी मंडळी खेड्यापाड्यातही आहे. अगदी आपल्या जिल्ह्यातल्या पार्डीनस्करी नावाच्या पाच पन्नास घरांच्या गावातही ही स्थिती आहे. पण जसे एकाकी वृद्ध आहेत, तसे संवेदनशील तरुणही आहेत. म्हणूनच तरुणांनी एकत्र येऊन निराधार आजी-आजोबांसाठी मेस सुरू केली. म्हाताºयांना ‘वात्सल्य’ देणाऱ्या या मेसची उद्या वर्षपूर्ती होत आहे.घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी नावाच्या गावात ही मेस ‘वात्सल्य भोजनालय’ म्हणून गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला सुरू झाली. या गावात असे काही वृद्ध आहेत, ज्यांना कोणाचाच आधार नाही. स्वत: कमावण्यासाठी अंगात त्राण नाही. शासनाने कधीतरी वेळेवर दिलेल्या निराधार मानधनाच्या पैशातून बेसन-भाकर शिजवायची. चूल पेटवताना फुंकणीत अक्षरश: प्राण फुंकायचा. थरथरत्या हातांना तव्याचे चटके लावून घ्यायचे. दोन घास पोटात लोटायचे अन् पुन्हा एकटेच आढ्याकडे बघत बसून राहायचे... ही सरत्या जिंदगीची अवस्था घाटंजीतील विकासगंगा सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पाहिली. आणि या खेड्यातल्या वृद्धांचा स्वयंपाकाचा त्रास संपला.गावातीलच एका घरात वृद्धांसाठी वात्सल्य भोजनालय सुरू झाले. १९ वृद्धांना येथे रोज सकाळी १० ते १२ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गरमागरम जेवण दिले जाते. सर्व वृद्ध वेळेवर भोजनालयात येऊन एकत्र बसून जेवतात. जेवताना आयुष्यातले सुख-दु:खही एकमेकांशी वाटून घेतात. थोडा हास्यविनोदही होतो. सुखाचे दोन घास घेऊन पुन्हा आपापल्या घरी आरामाला जातात. भोजनालयाचे तीन सदस्य मात्र तब्येतीच्या कारणामुळे भोजनालयापर्यंत येऊ शकत नाही. त्यांचा डबा घरपोच दिला जातो.विकासगंगा संस्थेचे प्रमुख रणजित बोबडे यांच्या उपक्रमाची माहिती मिळताच मुंबईच्या केअरिंग फ्रेण्ड्स ग्रुपनेही आर्थिक भार उचलला.वृद्धांचा स्वाभिमान मात्र शाबूत६ पुरुष आणि १३ महिला असे १९ वृद्ध सध्या वात्सल्य भोजनालयाचे लाभार्थी आहेत. विकासगंगा आणि केअरिंग ग्रुप या मेसचा भार वाहत असले, तरी हे वृद्ध फुकट जेवत नाहीत. निराधार मानधन म्हणून ज्यांना ६०० रुपये मिळतात, त्यातले २०० रुपये ते मेसच्या कामासाठी देतात. ज्यांना असे निराधारचे मानधनही मिळत नाही, ते रेशनदुकानातील किलो-दोन किलो धान्य देतात.नातेवाईकांनी नेले, तरी मेसमध्ये परतलेवृद्धांची नेमकी व्यथा घाटंजीतील तरुणांनी ओळखली आणि रचला महाराष्ट्रातील वृद्धांच्या पहिल्या आणि एकमेव मेसचा पाया! मेसचा आसरा मिळालेल्या १९ वृद्धांपैकी दोन वृद्धांचे नातेवाईक जरा नाराज झाले होते. ते बाहेरगावी राहायचे आणि आपल्या कुटुंबातील म्हातारी व्यक्ती मेसमध्ये जेवते, हे त्यांना खटकले. ते त्या दोन वृद्धांना आपल्या सोबत बाहेरगावी घेऊनही गेले. पण त्यातील एक वृद्ध स्वत:च्याच घरात एकाकी झाला. नातेवाईकांच्या वाईट वर्तनाला कंटाळून तो परत पार्डी नस्करीत येऊन पुन्हा वात्सल्य भोजनालयाचा सदस्य झाला आहे. हाच या मेसच्या ‘घरगुती’पणाचा पुरावा.