शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड घोटाळ्यात एलआयसी चौकातील झेरॉक्स सेंटर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 22:32 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या समोरील पेशीनंतर गतिमान झालेल्या ‘एसआयटी’ने कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्यातील सातव्या आरोपीला रविवारी रात्री अटक केली.

ठळक मुद्देसलग दुसरी कारवाई : सातवा आरोपी जेरबंद, चार दिवसांचा पीसीआर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या समोरील पेशीनंतर गतिमान झालेल्या ‘एसआयटी’ने कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्यातील सातव्या आरोपीला रविवारी रात्री अटक केली. दरम्यान पोलिसांनी सोमवारी एलआयसी चौकातील झेरॉक्स सेंटरला सील लावले. तेथे घोटाळ्यातील बनावट कागदपत्रे तयार झाल्याचा संशय आहे.शिवा तिवारी असे या आरोपीचे नाव आहे. तो बाभूळगाव पंचायत समितीमध्ये कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. सोमवारी न्यायालयात उपस्थित केले असता त्याला २३ आॅगस्टपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विशेष असे शिवाच्या सहभागाचे भाकित ‘लोकमत’ने तीन आठवड्यांपूर्वीच वर्तविले होते, ते त्याच्या अटकेने तंतोतंत खरे ठरले. भूखंड घोटाळ्यात आतापर्यंत सात गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक गुन्हा २०१६ मध्ये नोंदविला गेला होता. या गुन्ह्यांमध्ये ‘एसआयटी’ने आतापर्यंत आरिफ अली, डॉ. अमोल मुजमुले, नीलेश बानोरे, नीलेश उनाडकर, लतेश चमेडिया, अर्जनवीस प्रकाश विठाळे यांना अटक केली. लतेशच्या अटकेपूर्वी ‘एसआयटी’च्या एका अधिकाऱ्याने सुमारे दोन तास राजकीय मार्गदर्शन घेतल्याचे बोलले जाते. पोलिसांनी न्यायालय रोडवरील प्रवीण झेरॉक्स सेंटर सील केल्यानंतर लतेश व प्रकाशच्या घराची झडती घेतली.आरोपींचे हस्ताक्षर नमुनेही घेण्यात आले आहे. सोमवारी एलआयसी चौकातील जयस्वाल यांचे साई झेरॉक्स सेंटर सील करण्यात आले. दाखल झालेल्या सात पैकी चार गुन्ह्यांमध्ये राकेश यादव व मंगेश पन्हाळकर हे आरोपी आहेत. तेच सध्या तरी या प्रकरणात सूत्रधार आहेत. त्यांच्या अटकेचे आव्हान ‘एसआयटी’पुढे आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस