शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

भंगार विकता विकता शोधला नाण्यांचा खजिना अन् ज्ञान मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी यवतमाळच्या संविधान चौकात ज्ञानाची जत्राच भरली होती. अमूल्य पुस्तकांचे स्टॉल्स गर्दी खेचत होते. तर त्याच गर्दीत रस्त्यावर सतरंजी अंथरून रामभाऊ खोब्रागडे जुन्या नाण्यांचा संग्रह मांडून बसलेले. कत्तू, खडकू, छदाम... अशा किमतीचे नाणे असते हे आजच्या पिढीने ऐकलेही नसेल. गोल नाण्याला मध्येच ‘छिद्र’ असा पैसा कदाचित लहानपणी कोणी खेळणे म्हणून वापरले असेल.

ठळक मुद्देडॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा : छदाम... कत्तू... खडकू ...अन् गोल नाणे !, एका पैशाचे होतात हजार रुपये

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘प्रॉब्लेम आॅफ रूपी’ हा ग्रंथ लिहून जगाचे डोळे दीपविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा काय असते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे, यवतमाळचे रामभाऊ खोब्रागडे. ज्या नाण्यांना आज कवडीचीही किंमत नाही, त्यातूनच त्यांनी हजारोंच्या कमाईचा व्यवसाय उभा केला आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या उत्सवात हा ‘हिरा’ अनुयायांचे लक्ष वेधून गेला.महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी यवतमाळच्या संविधान चौकात ज्ञानाची जत्राच भरली होती. अमूल्य पुस्तकांचे स्टॉल्स गर्दी खेचत होते. तर त्याच गर्दीत रस्त्यावर सतरंजी अंथरून रामभाऊ खोब्रागडे जुन्या नाण्यांचा संग्रह मांडून बसलेले. कत्तू, खडकू, छदाम... अशा किमतीचे नाणे असते हे आजच्या पिढीने ऐकलेही नसेल. गोल नाण्याला मध्येच ‘छिद्र’ असा पैसा कदाचित लहानपणी कोणी खेळणे म्हणून वापरले असेल. पण ती कालबाह्य झालेली नाणी रामभाऊंनी सर्वांसाठी खुली केली होती. एकेकाळी याच खडकूमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळायच्या. आज चलनाबाहेर गेलेली ही नाणी लोकांच्या मनातून काही गेलेली नाही, याचा प्रत्यय रामभाऊंच्या संग्रहाजवळील गर्दीने आला.हे दुकान आहे की संग्रहालय, असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. पण त्याचा उलगडा रामभाऊंनीच केला. ते म्हणाले, रोजगार शोधता शोधता मला हा मार्ग सापडला. यात शौकही पूर्ण झाला आणि मजुरीही झाली. आज सकाळपासून अडीच हजारांचा धंदा झाला.रामभाऊंची कहाणी काही औरच आहे. त्यांनी सुरवातीला भंगारचा धंदा सुरू केला. एकदा १९७३-७४ च्या सुमारास ते बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला गेले. तेव्हा तेथे जुणी नाणी त्यांच्या पाहण्यात आली. लोक ती खरेदी करीत होते. रामभाऊंच्याही मनात लगेच विचार चमकला, आपणही अशी नाणी विकली तर! त्यांनी मुंबई पालथी घालून अशा नाण्यांचा शोध घेतला. संग्रह जमविला.अन् पुढच्याच वर्षी यवतमाळातील महापरिनिर्वाण दिनाच्या उत्सवात स्टॉल लावला. जबरदस्त प्रतिसाद लाभला. तेव्हापासून त्यांचा हा नित्यक्रम सुरूच आहे. आता केवळ मुंबईच नव्हेतर, यवतमाळातीलही अनेकांच्या संपर्कात राहून ते जुण्या नाण्यांचा संग्रह अविरत करीत असतात. किरकोळ किमतीत मिळालेली ही नाणी ते घसघशीत किमतीला विकतात. त्यांच्याकडे मोगल काळापासून तर ब्रिटिश काळापर्यंतची नाणी आहेत. विविध देशातील चलनी नोटाही आहेत.ही नाणी विकणारे रामभाऊ आणि विकत घेणारे छंदिष्ट हे दोघेही एकप्रकारे ज्ञानाचीच देवाण-घेवाण करीत आहेत.