शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ उपक्रमाचे शिलेदार अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 23:50 IST

वित्त विभागाने राज्याची आर्थिक स्थिती डबघाईस आल्याचे कारण पुढे करीत विविध विभागांच्या खर्चावर निर्बंध घातले. त्यामुळे मे महिन्यापासून राज्यभरातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील (डायट) ८५० कर्मचाऱ्यांचे वेतन थांबले आहे.

ठळक मुद्देडायटची यंत्रणा पगाराविनाअधिव्याख्यांतांसह ८५० कर्मचारी लॉकडाऊनचे बळी

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यास डायटची यंत्रणा झटत आहे. मात्र ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ उपक्रमाचे हे शिलेदारच गेल्या चार महिन्यांपासून पगाराविना अस्वस्थ आहेत. केंद्र शासनाने टाळलेला आर्थिक हिस्सा आणि राज्य शासनाने केलेले दुर्लक्ष ऐन गरजेच्या वेळी डायटची यंत्रणा खिळखिळी करण्यास कारणीभूत ठरत आहे.

राज्यात २४ मार्चपासून लॉकडाऊन घोषित झाला. त्यानंतर वित्त विभागाने राज्याची आर्थिक स्थिती डबघाईस आल्याचे कारण पुढे करीत विविध विभागांच्या खर्चावर निर्बंध घातले. त्यामुळे मे महिन्यापासून राज्यभरातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील (डायट) ८५० कर्मचाऱ्यांचे वेतन थांबले आहे.

प्रत्येक जिल्ह्याच्या डायटमध्ये एकंदर २६ पदे मंजूर आहे. त्यात ११ पदे ही प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता अशी पहिल्या श्रेणीतील पदे आहेत. तर उर्वरित १५ पदांमध्ये विषय सहायकांपासून तर शिपायांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. चार महिन्यांपासून पगार नसला तरी हे कर्मचारी ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

मात्र आता आर्थिक तंगीचा कडेलोट होत असल्याने साहाजिकच कामावर परिणाम होत असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. डायटच्या कर्मचाºयांच्या पगारासाठी जे अनुदान येते त्यात केंद्र शासनाचा ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के वाटा असतो. लॉकडाऊनच्या काळात केंद्राचा ६० टक्के वाटा मिळाला नाही, असा कांगावा करीत राज्य शासनानेही ४० टक्के वाटा वितरित केला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार थांबले आहेत.शासनाच्या प्राधान्यक्रमात डायटला डच्चूराज्याची आर्थिक स्थिती लॉकडाऊनमुळे बिघडल्याने खर्चाचे नियोजन करण्याबाबत वित्त विभागाने ४ मे रोजी आदेश निर्गमित केला. त्यात केंद्र पुरस्कृत योजना व राज्याचा हिस्सा याबाबत सविस्तर निर्देश देण्यात आले. यंदाच्या निधीतून ज्या योजनांमधील मानधन, वेतन आणि निवृत्ती वेतन अदा करायचे आहे, अशा योजना आणि उपक्रमांचा प्राधान्यक्रम देताना डायटचा उल्लेख टाळण्यात आला आहे.

टॅग्स :Schoolशाळा