शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विचित्र घटनेत कामगार ठार; उलटलेला ट्रक काढताना क्रेनही उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 20:33 IST

Yawatmal News उलटलेला ट्रक सरळ करताना अवजड क्रेनही उलटली. या विचित्र अपघातात एक मजूर क्रेनखाली दबून जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी यवतमाळ-आर्णी मार्गावरील बोथबोडन फाट्याजवळ घडली.

 

यवतमाळ : उलटलेला ट्रक सरळ करताना अवजड क्रेनही उलटली. या विचित्र अपघातात एक मजूर क्रेनखाली दबून जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी यवतमाळ-आर्णी मार्गावरील बोथबोडन फाट्याजवळ घडली.

प्रेमदास लक्ष्मण पाटील (६०, रा. आंबेडकरनगर, डोर्ली यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोंबडीचे खाद्य घेऊन यवतमाळवरून आर्णीकडे निघालेला ट्रक (एमएच-४०-बीजी-५३७८) बोथबोडन फाट्याजवळ उलटला. हा ट्रक काढण्यासाठी मजुरांसह क्रेन (एमएच-२९/व्ही-१८८१) बोलावण्यात आली. मात्र, ट्रक सरळ करण्याच्या प्रयत्नात क्रेनच उलटली. या क्रेनखाली प्रेमदास पाटील दबून त्याचा जागीच मृत्यू झाला.

दुसरी क्रेन बोलावली अन् तीही उलटली

उलटलेली क्रेन आणि ट्रक काढण्यासाठी दुसरी क्रेन बोलवण्यात आली. मात्र, तीही उलटली. सुदैवाने या प्रकारात कुणालाही दुखापत झाली नाही. कामगाराच्या मृत्यूप्रकरणी संजय सुखदेव पाटील यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. त्यावरून क्रेनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात तपास केला जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात