शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

सायबर गुन्हेगारांचेही ‘वर्क फ्रॉम होम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:01 IST

सायबर गुन्हेगारांनीही ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू केले असून घरी मोबाईलला चिटकून असलेल्या नागरिकांसाठी ‘फिशरी’ ट्रॅप लावला आहे. त्यातूनच ‘तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा’ असे मेसेज मोबाईलवर पाठविले जात आहेत. काही जण ‘क्लिक’ करून या ट्रॅपमध्ये अडकतही आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये ‘फिशरी’ ट्रॅप : खात्यात दोन हजार रुपये जमा झाल्याचे फिरताहेत मेसेज

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन असल्याने बहुतांश लोक घरात आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. सायबर गुन्हेगारांनीही ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू केले असून घरी मोबाईलला चिटकून असलेल्या नागरिकांसाठी ‘फिशरी’ ट्रॅप लावला आहे. त्यातूनच ‘तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा’ असे मेसेज मोबाईलवर पाठविले जात आहेत. काही जण ‘क्लिक’ करून या ट्रॅपमध्ये अडकतही आहेत.लॉकडाऊनमुळे सर्व लोकांचा बहुतांश वेळ मोबाईलमध्ये जातो. हीच संधी साधून सायबर गुन्हेगार सक्रिय झाले. मोबाईलव्दारे डेटा मिळविणे, अकाऊंट हॅक करणे, खात्यातील रक्कम काढून घेणे असे प्रकार झपाट्याने वाढले आहे. त्यासाठी आधी पैसे देण्याचे आमिष दाखविले जाते. तुमच्या खात्यात दोन हजार रुपयांची रोख थेट जमा होणार असून तुमचे त्यासाठी सिलेक्शन केले गेले आहे. सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा, लगेच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील अशा स्वरूपाचे हे मेसेज मोबाईलवर पाठविले जातात. आमिषाला बळी पडून अनेक लोक विशेषत: महिला कोणताही विचार न करता लगेच या लिंकवर क्लिक करतात आणि त्यांच्या बँक खात्याचा डेटा सायबर गुन्हेगारांना मिळतो.अशा पद्धतीचे मेसेज जिल्ह्यात शेकडो नागरिकांना मोबाईलवर प्राप्त झाले आहेत. काहींनी सावधगिरीने केवळ मेसेज वाचून सोडून दिले. तर काही जण सायबर गुन्हेगारांनी लावलेल्या जाळ्यात (फिशरी ट्रॅप) अडकले. यातून अनेकांची फसवणूक झाली असावी, असा अंदाज आहे. मात्र कुणी बदनामीमुळे तर कुणी पोलिसांचा ससेमिरा मागे लागण्याच्या भीतीने तक्रार देणे टाळले. एका युवकाची तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचली. त्याच्या खात्यात दीड हजार रुपये होते आणि हॅकर्सने या मेसेजद्वारे दीड हजारांची ती संपूर्ण रक्कम खात्यातून उडविली. सर्वत्रच लॉकडाऊनमुळे हॅकर सक्रिय झाले आहेत. वेगवेगळ्या मेसेजद्वारे डेटा हॅक केला जातो. मोबाईल नंबर ज्या बँक खात्याला कनेक्ट असेल त्यातील डेटा हॅकर उडवितात.सायबर क्राईम शाखेचा सल्ला पाळा, फसवणूक टाळायवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेअंतर्गत सायबर सेल ही इंटरनेट व बॅकिंगशी संबंधित फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास करणारी स्वतंत्र शाखा आहे. या शाखेकडून नागरिकांना सतर्क राहण्याबाबत वारंवार सूचना केली जाते. मात्र त्यानंतरही ही सूचना दुर्लक्षित केल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसतो व मग पश्चातापाची वेळ येते. म्हणून या सायबर शाखेने नागरिकांना काही सूचना व सल्ले दिले आहेत. त्यानुसार, बँक कधीच कुणाचा खाते क्रमांक, पासवर्ड विचारत नाही. नागरिकांनी स्वत: बँकेत जावे, अशा फेक मोबाईल कॉलला बळी पडू नये, मोबाईल मेसेजवरून कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करू नये, क्लिक करण्याआधी मेसेज वारंवार वाचला जावा, समजून घेतला जावा, व्यापाऱ्यांनी ही खबरदारी घ्यावी. ऑनलाईन खरेदी करताना त्या बँक खात्यात शक्यतोवर मोठी रक्कम ठेऊ नये. मोबाईल, संगणक, लॅपटॉप ही उपकरणे आधी सतर्कतेचा इशारा देतात, व्हायरस शिरत असेलतरी संदेश येतो, त्याकडे खास लक्ष द्यावे, असे सायबर शाखेने म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या