शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्रीविरूद्ध महिलांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:00 IST

वणी तालुक्यातील नायगावलगत एका पानठेल्यातून अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सदर पानठेला पेटवून दिला. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तणावाची स्थिती निर्माण झाली.

ठळक मुद्देनायगाव येथे रस्ता रोको : महिलांनी पेटविला अवैध दारूविक्रीचा ठेला

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी तालुक्यातील नायगावलगत एका पानठेल्यातून अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सदर पानठेला पेटवून दिला. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तणावाची स्थिती निर्माण झाली. अवैध दारूविक्रेत्याविरूद्ध कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती.शासनाने राज्य मार्गालगतचे बिअर बार व दारूविक्रीचे दुकाने बंद केल्याने तालुक्यात अवैध दारूविक्रीचे अड्डे वाढले आहेत. वणी-वरोरा मार्गावर नायगाव येथे रस्त्यालगत एका ठेल्यामधून अवैधपणे दारूविक्री होत होती. तसेच बंद झालेल्या एका बिअर बारलगतसुद्धा अवैधपणे दारूविक्री होत होती. ही बाब नायगाव व सावर्ला येथील नागरिकांच्या लक्षात आली. त्यामुळे गावातील महिला संतप्त झाल्या व त्यांनी मंगळवारी हा ठेलाच पेटवून तासभर राज्य मार्ग रोखून धरला. वणी पोलीस घटनास्थळी पोहोचून आंदोलनातील काही महिला व पुरूषांना स्थानबद्ध केले व त्यांना समज देऊन काही वेळाने सोडून देण्यात आले. यावेळी पोलिसांनी आश्वासन दिल्यामुळे महिलांनी हे आंदोलन मागे घेतले.त्यातील काही महिलांनी बंद बिअर बारजवळील ठेला पेटविण्यासाठी धाव घेतली. तेव्हा दारूविक्री करणारा एक इसम दारूच्या शिश्या भरलेली थैली सोडून पळून गेला. वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे आपल्या पोलीस ताफ्यासह पोहोचल्यामुळे हा ठेला मात्र बचावला. पोलिसांनी अखेर दारूविक्री करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरूद्ध मुंबई दारूबंदी अधिनियम ६५ ई अंतर्गत गुन्हा नोंदवून दारूच्या ३२ (एक हजार ७६० रूपये) शिश्या घटनास्थळावरून जप्त केल्या. एक तास राज्य मार्ग रोखून धरल्याने रस्त्याच्या दोन्हीही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एक तासानंतर तणाव निवळल्यानंतर राज्य मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली होती.

टॅग्स :liquor banदारूबंदी