शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

महिला संघटना झाल्या आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 06:00 IST

हिंगणघाट येथे प्राध्यापक युवतीला पेट्रोल टाकून पेटविण्यात आले. या घटनेचे संतप्त पडसाद बुधवारी यवतमाळात उमटले. विविध संघटनांनी एकत्र येत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपीला पेटवा, अशा संतप्त प्रतिक्रिया महिला वर्गातून यावेळी उमटल्या. येथील बसस्थानक चौकातील शिवतीर्थावर विविध संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. यावेळी आंदोलकांनी हिंगणघाट येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला.

ठळक मुद्देहिंगणघाट प्रकरणाचा निषेध : आरोपीला ताब्यात देण्याची मागणी, काँग्रेसचेही निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हिंगणघाट येथे प्राध्यापक युवतीला पेट्रोल टाकून पेटविण्यात आले. या घटनेचे संतप्त पडसाद बुधवारी यवतमाळात उमटले. विविध संघटनांनी एकत्र येत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपीला पेटवा, अशा संतप्त प्रतिक्रिया महिला वर्गातून यावेळी उमटल्या.येथील बसस्थानक चौकातील शिवतीर्थावर विविध संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. यावेळी आंदोलकांनी हिंगणघाट येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. भविष्यात अशा घटनाच घडू नये यासाठी केंद्र शासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे करावे, अशी मागणी करण्यात आली. सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोेर्टापुढे ठेवण्यात यावे, अशी मागणी यावेळी महिला संघटनांनी केली.यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी नारी रक्षा समिती, पीस आॅफ इंडिया, जिजाऊ ब्रिगेड, जिजाऊ बहुद्देशीय संस्था, कलाकुंज बहुद्देशीय महिला प्रशिक्षण संस्था, अखिल भारतीय महिला संविधानिक हक्क परिषद, यवतमाळ जिल्हा प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन, सह्यांद्री यूथ फाउंडेशन, सिहसंना द लॉयन आर्मी, यवतमाळ जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, रणरागिनी संघटना, अस्तित्व फाउंडेशन, निमा संघटना, संकल्प फाउंडेशन, वनिता वाहिनी अशा विविध संघटनाचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते.आंदोलनात सरोज देशमुख, अवंती चौधरी, मनीषा तिरनकर, अंजली फेंडर, मीरा फडणीस, मधुरा वेळूकर, काजल कांबळे, पुष्पा जाधव, शितल तेलंगे, उज्वला झाडे, मंदा मडावी, दुर्गा पटले, रेखा पलटनकर, विजया वादाफळे, पूजा मुनगिनवार, अवंती सातपुते, पुजा दोंदल, विनोद दोंदल, सुशांत वंजारी, रोहन आदेवार, निरज डफळे, विनोद संगीतराव, विजय विसपुते, जितेंद्र सातपुते, योगिराज अरसोड, अनिल चिंचोळकर, संजय पवार, प्रवीण शेटे, विनोद भोसले आदी सहभागी झाले होते.काँग्रेसने नोंदविला निषेधहिंगणघाट येथील घटनेचा जिल्हा काँग्रेसने निषेध नोंदविला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक चंद्रशेखर चौधरी, नगरसेवक विशाल पावडे, नगरसेविका पल्लवी रामटेके, विक्की राऊत, अजय किनकर, शब्बीर खान, लाला तेलगोटे, राहूल वानखडे, ललित जैन, निशांत नैताम, रोहित देशमुख, मोहसीन खान, शकील पटेल, अ‍ॅड.संजय जैन आदी उपस्थित होते.जनहित माझे गाव संघटनाहिंगणघाट येथे प्राध्यापक युवतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा ‘जनहित माझे गाव’ संघटनेतर्फे निषेध नोंदविण्यात आला. संघटनेच्या लोहारा येथील कार्यालयात निषेध सभा घेण्यात आली. यावेळी जनहित माझे गाव संघटनेचे अध्यक्ष विलास झेंडेकर, पद्माकर घायवान आदींसह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :WomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी