शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

मुलीच्या लग्नाआधीच घडले विपरीत; घराला लागलेल्या आगीत काकूचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 16:37 IST

​​​​​​​शहरातील गणेश चौकातील घराला गुरुवारी रात्री १.१५ वाजता आग लागली. पाहता पाहता धुराचे लोट उठले व पुढच्या काही क्षणात होत्याचे नव्हते झाले.

ठळक मुद्देबहीण-भाऊ जखमी यवतमाळातील गणेश चौकातील घटना

यवतमाळघरात मंगलकार्य असल्याने पुट्टेवार कुटुंबीय उत्साहात होते. किराणा, कपडे आदि साहित्य आणून ठेवले होते. परंतु, मध्यरात्रीच्या सुमारास अचानक घराला आग लागली व आनंद दु:खात बदलून गेला. या घटनेत मुलीच्या काकूचा होरपळून मृत्यू झाल्याने पुट्टेवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

शहरातील गणेश चौकातील घराला बुधवारी रात्री १.१५ वाजता आग लागली. या आगीने काही मिनिटातच रौद्ररुप धारण केले. मदतीसाठी सर्वच जण प्रयत्न करीत असताना आगीमुळे कुणालाही पुढे जाता येत नव्हते. या आगीत पहिल्या माळ्यावर झोपून असलेल्या रेखा विनोद पुट्टेवार (५६) यांचा होरपळून मृत्यू झाला. तर प्रगती व यश प्रमोद पुट्टेवार हे बहीण-भाऊ जखमी झाले.

पुट्टेवार कुटुंबातील दोन्ही भावांचे निधन झाल्याने रेखा व ज्याेती या दोन जावा व्यवसाय करून कुटुंब चालवत होत्या. अंत्यविधी साहित्य विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता. त्यासाठी घरासमोरच बांबू, गवत, गवऱ्या, लाकूड व इतर साहित्य ठेवलेले होते. रात्री अचानक या साहित्याने पेट घेतला, व आगीने रौद्ररुप धारण केले. घराजवळ भूमिगत वीजजोडणीची पेटी आहे. यातून शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

या आगीत संपूर्ण घर जळून राख झाले. पहिल्या मजल्यावर रेखा पुट्टेवार खोलीत झोपल्या होत्या. जमिनीवरच्या साहित्याने पेट घेतल्यानंतर आगीच्या ज्वाळा पहिल्या मजल्यावरील खोलीपर्यंत पोहोचल्या. दरवाजे, खिडक्यांनी पेट घेतला. चारही बाजूंनी आगीचे लोट उठले होते. यामुळे उष्णतेने व धुराने गुदमरून रेखा पुट्टेवार यांचा मृत्यू झाला. त्यांना वाचविण्यासाठी धडपणाऱ्या यश आणि प्रगती या दोघांचेही हात भाजले.

प्रत्येकजण आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. या परिसरात घरे दाटीवाटीने आहेत. त्यामुळे इतरत्र आग पसरण्याचा धोका वाढला. १ वाजून २० मिनिटांनी अग्निशमन दलाला फोन करण्यात आला. पाच मिनिटांत अग्निशमन बंब हजर झाला. सलग पाच बंब रिकामे केल्यानंतर आग नियंत्रणात आली. मात्र तोपर्यंत जवळपास २० लाखांचे नुकसान या आगीत झाले होते.

मुलीच्या लग्नाची होती तयारी

ज्योती पुट्टेवार यांची मोठी मुलगी प्रगती हिचे लग्न जुळले आहे. त्याची तयारी पुट्टेवार कुटुंब करीत होते. लग्नासाठीचा कपडा, किराणा घरी आणला होता. तोही या आगीत जळून खाक झाला आहे. अशीच एक घटना तीन वर्षांपूर्वी लोखंडी पूल परिसरात घडली होती ज्यात घराला लागलेल्या आगीत एका चिमुकलीचा होरपळून मृत्यू झाला. ही आग दिवसा लागली होती. त्याची आठवण गुरुवारच्या घटनेने ताजी केली.

टॅग्स :AccidentअपघातfireआगYavatmalयवतमाळ