शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

वो दुनिया बाबुल का घर, ये दुनिया ससुराल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त दर्डा उद्यानातील शक्तीस्थळावर स्वरांजली ...

ठळक मुद्देअंजली गायकवाड, अमेय दातेची मैफल : ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘शक्तीस्थळ’ येथे ‘स्वरांजली’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त दर्डा उद्यानातील शक्तीस्थळावर स्वरांजली कार्यक्रम पार पडला. यावेळी अंजली गायकवाड आणि अमेय दाते या गायकांनी भक्तीगीतापासून कव्वालीपर्यंतचे ‘व्हर्सटाईल’ गायन केले.‘तेरेबिना गुजारा ऐ दिल हैं मुश्कील’ हे गाणे म्हणतानाच ‘लागा चुनरी मे दाग छिपाऊ कैसे’ हे अस्सल शास्त्रीय पठडीतील आणि गहन आशय असलेले गाणेही अमेयने ताकदीने सादर केले. ‘वो दुनिया मोरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल’ अशा ओळींतून मानवीजीवनाची क्षणभंगुरता स्पष्ट झाली. अशा गाण्यांनी गंभीर बनलेल्या वातावरणात अमेय दाते यांनी ‘मेरे रश्के कमर’, ‘पहली नजर मे कैसा जादू कर दिया’सारख्या सिनेगीतांनी हलकेफुलकेपणा कायम राखला.तर अंजली गायकवाडने पुन्हा मंच ताब्यात घेत ‘आता वाजले की बारा’, ‘हसता हुआ नुरानी चेहरा’ गायले. विशेष म्हणजे, आजवर कधीही ‘डुएट’ गायनाचा अनुभव नसतानाही अंजलीने ऐनवेळी ‘परदेसी परदेसी जाना नही’ हे गाणे अमेय दातेसोबत सादर करून रसिकांना चकित केले. ‘फुल गेंदवा न मारो लगत करेजवा मे चोट’ ही शास्त्रीय रचनाही तिने सादर केली. प्रत्येक गाण्यावर टाळ्यांचा पाऊस पाडणाऱ्या रसिकांनी शेवटी ‘फर्माईशीं’चाही पाऊस पाडला. त्यावेळी ‘जिंदगी के सफर मे गुजर जाते हैं जो मकाम वो फिर नही आते’, ‘आनेवाला पल जानेवाला हैं’, ‘मेघा रे मेघा रे मत परदेस जा रे’, ‘पल पल दिल के पास तुम रहती हो’, ‘परदा है परदा’ या फर्माईशी पूर्ण करीत दोन्ही गायकांनी यवतमाळकर रसिकांचे हृदय जिंकून घेतले.ज्योत्स्ना दर्डा यांना गायकांसह मान्यवरांची श्रद्धांजलीमैफलीला आरंभ करण्यापूर्वी लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शक्तिस्थळावरील ज्योत्स्ना दर्डा यांच्या भव्य पुतळ्यापुढे दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी अंजली गायकवाड, अमेय दाते या दोन्ही गायकांसमवेत लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, ज्योत्स्ना दर्डा यांचे थोरले बंधू तथा जळगावचे माजी महापौर रमेशदादा जैन, ज्योत्स्ना दर्डा यांच्या वहिनी तथा माजी आमदार मधुभाभी रमेशदादा जैन, पूर्वा सुनीत कोठारी, माजी आमदार कीर्ती गांधी, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा आदी मान्यवर उपस्थित होते.स्थानिक कलावंतांच्या गायनाने रंगली संगीतमय श्रद्धांजली सभालोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या सहाव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने शनिवारी सकाळी ‘शक्तिस्थळा’वर ‘संगीतमय श्रद्धांजली सभा पार पडली. यावेळी यवतमाळातील गायक कलावंतांनी दर्जेदार गीतरचना सादर केल्या. प्रथितयश गायक आणि अमोलकचंद महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख प्रा. राहुल एकबोटे यांच्या मार्गदर्शनात राजू कोळमकर, जेडीआयईटीचे प्रा. अतुल शिरे, अपर्णा शेलार, श्रमिता नगराळे यांनी दर्जेदार गाणी व अभंगरचना सादर केल्या. तर सुरेंद्र महल्ले, नरेंद्र राजूरकर, सचिन वालगुंजे, विशाल शेंदरकर या वाद्यवृंदांनी साथसंगत केली. यावेळी दर्डा परिवारातील सदस्यांसह यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचन चौधरी, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.विविधांगी गायन, वाद्यवृंदांचा सत्कारफक्त तेरा वर्षांची अंजली आणि युवा गायक अमेय यांच्या ‘व्हर्सटाईल’ गायनाची अनुभूती यावेळी आली. अभंग, भक्तिगीत, भावगीत, नाट्यगीत, प्रेमगीत, विरहगीत, सिनेगीत, कव्वाली अशा विविधांगी प्रकारातील गीतरचना सादर करण्यात आल्या. अंजली गायकवाड आणि अमेय दाते यांनी कधी ड्युएट तर कधी सोलो गायन करीत रसिकांना रिझविले. तर झिंग झिंग झिंगाट म्हणता-म्हणता खुबीने ‘शांताबाई’ गाणे सादर करून अमेय दाते यानी चमत्कृतीपूर्ण समारोप केला. अंजली गायकवाड हिचा सत्कार ज्योत्स्ना दर्डा यांच्या कन्या पूर्वा सुमित कोठारी, तर अमेय दाते यांचा सत्कार ज्योत्स्ना दर्डा यांचे पुतणे डॉ. लव किशोर दर्डा यांच्या हस्ते करण्यात आला. तर अंजलीचे वडील अंगद गायकवाड यांचा सत्कार किशोर दर्डा यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच आॅर्केस्ट्राचे प्रमुख नंदू गोहणे, वाद्यवृंद परिमल जोशी (किबोर्ड), रितेश त्रिवेदी (गिटार), पंकज यादव (तबला), अनिकेत दहेकर (ढोलकी) यांचाही सन्मान करण्यात आला. स्वरांजली मैफलीचे सूत्रसंचालन प्रा. अजय कोलारकर यांनी केले.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ