लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी : परिसरात शनिवारी मध्यरात्रीनंतर एक ते दीड तास प्रचंड वादळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले.यवतमाळ तालुक्यातील हिवरी, वाटखेड, नाका पार्डी, भांब, बेचखेडा या गावांमधील शेतकºयांचे ज्वारी, कापूस, तूर, सोयाबीनसह इतर पिके शेतात डोलत असताना शनिवारी मध्यरात्री व दोन दिवसाआधी असे दोन ठोक येवून गेले. त्यातच शनिवारच्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील डोलणारी पिके अक्षरश: झोपली आहे. शासनाकडून या नुकसानीचा सर्व्हे होवून त्वरित मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे. यावर्षी आधीच पावसाने दडी मारल्यामुळे अपेक्षित असे पीक नाही. त्यातही ज्या शेतकºयांकडे शेतात पाणी होते त्यांनी जीवाचे रान करून पीक वाढविले होते. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
हिवरी परिसरात वादळी पावसाचा पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 21:45 IST
परिसरात शनिवारी मध्यरात्रीनंतर एक ते दीड तास प्रचंड वादळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले.
हिवरी परिसरात वादळी पावसाचा पिकांना फटका
ठळक मुद्देज्वारीचे नुकसान : सर्व्हे करून भरपाईची मागणी