शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

कौटुंबिक वादातून ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून

By विशाल सोनटक्के | Updated: June 8, 2024 18:18 IST

हॉटेलमध्ये आढळले प्रेत : वाशिम मार्गावरील ढाब्यावरून पतीला मध्यरात्री अटक

यवतमाळ : पुसद शहरातील शनी मंदिर परिसरातील पंजाब नॅशनल बँकेसमोरील एका हॉटेलमध्ये एका विवाहित महिलेचा नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला होता. शुक्रवारी रात्री ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी आरोपी पतीला वाशिम मार्गावरील एका ढाब्यावरून जेरबंद केले आहे. कौटुंबिक वादातून ओढणीने गळा आवळून पत्नी सपनाचा खून केल्याची कबुली आरोपी पतीने दिल्याची माहिती ठाणेदार उमेश बेसरकर यांनी ‘लोकमत’ला दिली. यातील मृतक महिलेचे नाव सपना संजय मोरे (२३) तर आरोपीचे नाव संजय प्रदीप मोरे (२५, रा. निंबी, ता. पुसद) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसद तालुक्यातील बोरगडी येथील सपना लक्ष्मण पाईकराव हिचा संजय यांच्यात प्रेमाचे संबंध होते. दोघांचीही लग्न करण्याची इच्छा होती. मात्र, घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला व ११ मे २०२२ रोजी एका विहारामध्ये ते विवाहबंधनात अडकले. परंतु लग्नानंतर दोघांमध्ये नेहमीच खटके उडत होते. त्यातूनच या दोघांनी घटस्फोट घेण्याचेही ठरविले होते. याबाबतची कार्यवाही सुरू असतानाच सपना व संजय हे शुक्रवार, ७ जूनरोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास शहरातील शनी मंदिर परिसरातील पंजाब नॅशनल बँकेसमोरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या खोलीच्या दरवाजा उघडला नसल्याने व आवाज देऊनही खोलीतून कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने हॉटेलचे मालक देवेंद्र खडसे यांनी याबाबतची माहिती शहर पोलिस ठाण्याला दिली.

पोलिस पथकाने घटनास्थळ गाठून त्या रूमचे दार तोडून आतमध्ये प्रवेश केला असता बेडवर सपनाचा मृतदेह आढळून आला. मात्र, सपनाबरोबर असलेला तिचा पती संजय प्रदीप मोरे हा हॉटेलमधून पसार झाल्याचे पुढे आले. याप्रकरणी मृतक सपनाचे वडील लक्ष्मण पाईकराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुसद शहर पोलिसांनी आरोपी संजय प्रदीप मोरे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा अधिक तपास ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक धीरज बांडे, पोलिस काॅन्स्टेबल नीलेश उंचेकर, दिनेश सोळंके, मनोज कदम आदी करीत आहेत.

कसून चौकशीनंतर आरोपीने दिली खुनाची कबूलीसपनाचा गळा आवळून खून केल्यानंतर पती संजय मोरे हा रात्रीच हॉटेलमधून पसार झाला होता. पंचनाम्यानंतर शहर पोलिसांनी मृतदेह पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर तत्काळ आरोपीच्या शोधमोहिमेस सुरुवात केली. रात्री १ वाजताच्या सुमारास आरोपी संजय मोरे हा वाशिम मार्गावरील एका ढाब्यावर असल्याचे समजताच पोलिसांनी त्याला तत्काळ जेरबंद केले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने कौटुंबिक वादातून पती सपनाचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ