शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये बंद दुकानांमधून मागच्या दाराने सर्रास दारूविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 05:00 IST

अनेक बीअरबार, वाईनशाॅप, देशी दारू दुकाने, बीअर शाॅपी निर्बंधातही मागच्या दाराने चालविल्या गेल्या. तेथील दारूसाठा मोठ्या प्रमाणात व जादा दराने विकला गेला. त्यामुळेच गेल्या वर्षभरात एक्साईजला मिळणारा महसूल घटण्याऐवजी चक्क सव्वादोन कोटी रुपयांनी वाढला आहे. या वाढलेल्या महसुलातच दारूच्या अवैध मार्गाने विक्रीचे पुरावे दडले आहेत. 

ठळक मुद्देमहसूल दोन कोटींनी वाढला : पोलीस-एक्साईजची कारवाई नाममात्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेली सव्वा वर्ष कोरोनामुळे जिल्ह्यात लाॅकडाऊन आहे. या काळात अनेक महिने दारूविक्रीवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे दारूविक्री कमी होऊन एक्साईजच्या महसुलातही घट होणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात या निर्बंधातही पोलीस व दंडाधिकारीय यंत्रणेच्या नाकावर टिच्चून दारू विक्री केली गेली.अनेक बीअरबार, वाईनशाॅप, देशी दारू दुकाने, बीअर शाॅपी निर्बंधातही मागच्या दाराने चालविल्या गेल्या. तेथील दारूसाठा मोठ्या प्रमाणात व जादा दराने विकला गेला. त्यामुळेच गेल्या वर्षभरात एक्साईजला मिळणारा महसूल घटण्याऐवजी चक्क सव्वादोन कोटी रुपयांनी वाढला आहे. या वाढलेल्या महसुलातच दारूच्या अवैध मार्गाने विक्रीचे पुरावे दडले आहेत. वर्षभरात विकली गेलेली दारू ही वैधच होती. परंतु ती विकण्याची पद्धत मात्र अवैधरीत्या राबविली गेली. काही भागात दारूविक्रीत घट झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्या भागात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात झाली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या वर्षभर जिल्ह्यात सर्वत्रच दारूची अवैधरीत्या विक्री केली गेली. कारवाई मात्र नाममात्र झाली. तत्कालीन प्रशासनाने कारवाई करतानाही दुजाभाव केला. कुणाला अधिक, तर कुणाला नाममात्र दंड ठोठावण्यात आला.

वर्षभरात महसूल दोन कोटी रुपयांनी वाढला- दारू हा राज्य शासनाला सर्वाधिक महसूल देणारा स्रोत आहे. - राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत या शुल्काची वसुली केली जाते. गेल्या वर्षभरात हा महसूल दोन कोटी २५ लाख रुपयांनी वाढला.- यवतमाळ एक्साईजला महसूल वसुलीचे नवीन उद्दिष्ट १९ कोटींनी वाढवून ७६ कोटी करण्यात आले.

बीअर विक्रीत २४ टक्क्यांनी झाली घट

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात बीअरच्या विक्रीमध्ये २४ टक्क्यांनी घट झाली आहे. वर्षभरात १९ लाख ३८ हजार ८२२ लिटर बीअरची विक्री केली गेली.वर्षभरात एक कोटी ४८ लाख आठ हजार ५८६ लिटर देशी दारूची विक्री केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ती साडेसात लाख लिटरने घटली आहे.विदेशी दारूच्या विक्रीतसुद्धा वर्षभरात पाच टक्क्याने अर्थात पावणेदोन लाख लिटरने घट झाली आहे. विक्री कमी झाल्याने त्यात महसूल कमी मिळाला.

 

अवैध दारूचे १०५३ गुन्हे- गेल्या वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविक्री करून परवानाप्राप्त दारूला आव्हान देणाऱ्यांविरुद्ध तब्बल १०५३ गुन्हे नोंदविले आहेत.- गुन्हे दाखल झालेल्या १०५३ व्यक्तींकडून तब्बल एक कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात गावखेड्यातील दारूचाही समावेश आहे.

दारू कारखान्यामुळे महसुलात ४५ कोटींची वाढदेशी, विदेशी दारू व बीअरमधून मिळणारा यवतमाळ जिल्ह्याचा महसूल अधिकाधिक सात ते आठ कोटी राहिला असता. परंतु मंगरूळ येथील दारू कारखान्यामुळे हा महसूल ४५ कोटींनी वाढला आहे. गेल्या वर्षभरात ५७ कोटी २५ लाखांचा महसूल वसूल केला गेला.- सुरेंद्र मनपिया, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, यवतमाळ

 

टॅग्स :liquor banदारूबंदी