शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उन्हाळ्यात गाडीच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा का हवी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 18:31 IST

Yavatmal : उन्हाळ्यात टायर फुटण्याची ही आहेत प्रमुख कारणे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाहनातील टायरमध्ये कॉम्प्रेसरच्या माध्यमातून भरल्या जाणारी हवा आणि नायट्रोजन हवा यात मोठा फरक आहे. कॉम्प्रेसरमधील हवेपेक्षा नायट्रोजन हवा ही सर्वाधिक थंड आहे. यामुळे वाहन कितीही वेगात आणि कितीही वेळ चालविले तर टायर गरम येत नाही. परिणामी टायर फुटण्याचा धोका नसल्यासारखाच असतो. 

यामुळे चारचाकी वाहनांच्या सुरक्षेसाठी नायट्रोजन हवा ही सर्वाधिक सुरक्षित हवा मानली जाते. त्याच प्रमाणे दुचाकी वाहनातही नायट्रोजन हवा भरली तर हवा लवकर उतरत नाही. यामुळे दुचाकी वाहनाचा टायर फुटण्याचा धोका कमी होतो. गाडी चालविताना त्यात डिझेल किंवा पेट्रोल यावर लक्ष दिले जाते. मात्र गाडीला असलेल्या टायरकडे लक्षच दिले जात नाही. त्यातली हवा उन्हाच्या पाऱ्याने झपाट्याने घटते. अनेकवेळा तर टायर फुटून अपघात होतो. मात्र त्या बाबीकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष होते. वेळीच उपाय केले तर होणारा अपघात टाळता येतो. यासाठी वाहनधारकांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे.

उन्हाळ्यात टायर फुटण्याची ही आहेत प्रमुख कारणेराज्य मार्गावर आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामात सिमेंटचा वापर होत आहे. सिमेंट अधिक गरम असते. अशा परिस्थितीत लांब पल्ल्याचे वाहन रस्त्यावरून धावत असेल तर टायर गरम येतो. सोबत टायरमधील हवादेखील गरम होते. यामुळे टायर फुटून अपघात होण्याचा धोका असतो.

रिमोल्ड टायरचा पर्याय

  • मोठा टायर नवीन विकत घ्यायचा असेल तर त्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात. आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक ग्राहक अशा टायरला रिमोल्ड केले जाते. खासकरून ट्रॅक्टरचा टायर रिमोल्ड केला जातो. यावर काही काळ वाहन चालविता येते. मात्र त्यातून कायमस्वरूपी पर्याय निघत नाही.
  • मोठ्या टायरला रिमोल्ड करता 3 येते. मात्र दुचाकी वाहनाच्या टायरला रिमोल्ड केले तर त्याचा कुठलाही उपयोग होत नाही. असे टायर लवकरच फुटतात. दुचाकी वाहनाला रिमोल्डचा पर्याय धोकादायक आहे. यासाठी नवीन टायर शोधावे लागते.

तापमान ३६ अंशांवरहिवाळ्यात तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या जिल्ह्याचे तापमान ३६ अंशांपर्यंत वर चढले आहे. पुढील काळात हे ऊन अधिक तापणार आहे. अशा परिस्थितीत अधिक ऊन असल्यामुळे टायरमधील हवा कमी होते. अचानक हवा कमी झाल्यानंतर रस्त्यावरील खाच खळग्यात वाहनांचे मोठे नुकसान होते.

किती किलोमीटरनंतर बदलविणार टायर?चारचाकी वाहनामध्ये ५० हजार किलोमीटरनंतर टायर बदलणे आवश्यक आहे. त्यानंतर टायरवर अधिक दबाव पडण्यास सुरुवात होते. यामुळे एका बाजूने टायर घासल्या जातो. यातून टायर फुटण्याचा धोका वाढतो.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ