शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘साईड ब्रँच’चे पोलीस बंदोबस्ताला का नाहीत? थकलेल्या पोलिसांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:22 IST

महाराष्ट्र पोलीस दलाच्या विविध साईड ब्रँचमध्ये शेकडो पोलीस अधिकारी-कर्मचारी आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना काम नाही, यातील ५० वर्षाच्या आत असलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरावावे अशी मागणी पोलीस यंत्रणेतूनच पुढे आली आहे.

ठळक मुद्देमहासंचालक कार्यालयातील लिपिकवर्गीय यंत्रणेलाही फिल्डवर काढण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र पोलीस दलाच्या विविध साईड ब्रँचमध्ये शेकडो पोलीस अधिकारी-कर्मचारी आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना काम नाही, यातील ५० वर्षाच्या आत असलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरावावे अशी मागणी पोलीस यंत्रणेतूनच पुढे आली आहे.विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन व संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर उभे आहेत. त्यापैकी काहींना जीव गमवावा लागला. तर कित्येकांना कोरोनाची बाधा झाली. तासन्तास उन्हातान्हात आणि कोरोनाग्रस्त भागात जीव धोक्यात घालून ते ड्युट्या करीत आहे. परंतु सततच्या बंदोबस्तामुळे हे पोलीस थकले आहेत. त्यामुळे त्यांना पर्याय हवा आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केंद्रीय राखीव पोलीस दलाची मागणी केली. औद्योगिक सुरक्षा दलाच्या अनेक कंपन्या राज्यात तैनात झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी व लिपिकवर्गीय यंत्रणेला बाहेर काढून कोरोनाशी संबंधित कामे त्यांंना देण्यात आली आहे. यानिमित्ताने पोलीस दलातील साईड ब्रँचची सध्या बसून असलेली यंत्रणा चर्चेत आली आहे.

एसीबी, बीडीडीएसला कामच नाहीराज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), राज्य गुप्तवार्ता विभाग (एसआयडी), लाचलुतपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), नागरी हक्क संरक्षण विभाग (पीसीआर), बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) या सारख्या अनेक साईड ब्रँच पोलीस दलात आहेत. तेथे अनेक अधिकारी-कर्मचारी आहेत. काही कर्मचारी तर आठ ते दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी जणू ‘मुक्कामी’ आहेत. शासकीय कार्यालये बंद असल्याने लाच मागण्याचे प्रकार कमी आहेत. त्यामुळे एसीबीला सध्या काम नाही. सीआयडीकडे तसेही वर्षानुवर्षे तपासाच्या निमित्ताने प्रकरणे प्रलंबित असतात. लॉकडाऊन काळात आणखी महिना दोन महिने प्रकरणे प्रलंबित राहतील. ‘बीडीडीएस’लाही काम नाही.

कोरोना संकटात तरी युनिफॉर्म लावाया सर्व साईड ब्रँचमधील ५० वर्षाच्या निकषात बसणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरविले पाहिजे, अशी दोन महिन्यांपासून सतत बंदोबस्त करून थकलेल्या पोलिसांची मागणी आहे. साईड ब्रँचचे हे सर्व अधिकारी-कर्मचारी कायम सामान्य वेशात राहतात. किमान आता कोरोनासारख्या संकटाच्यावेळी तरी त्यांना पोलिसांचा युनिफॉर्म घालण्याची संधी द्यावी, असा सूर आहे.

शिपाई-जमादार बनले लिपिकअशीच अवस्था पोलीस महासंचालक कार्यालयात आहे. शासनाने मंत्रालयातील यंत्रणा बाहेर काढली. त्याच धर्तीवर महासंचालक कार्यालयातील लिपिकवर्गीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कोरोनाच्या कामात त्यांची सेवा घ्यावी, अशी मागणी आहे. पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, कमांडंट व त्यांच्या अधिनस्त विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पोलीस शिपाई-जमादारच लिपिकाचे काम करतात. त्यांनाही बंदोबस्तासाठी बाहेर काढण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस