शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी जबजब डरते है, ईडी को आगे करते है’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2022 05:00 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावून तासनतास बसवून ठेवले जात आहे. मोदी सरकारने राजकीय सुडापोटी ही कारवाई केली असून ईडीचा दुरुपयोग केला जात आहे. कुठलेही प्रकरण अंगावर येत असेल तर ईडीला पुढे करून मोदी सरकार स्वत:चा बचाव करीत आहे. यातूनच ही कारवाई होत असल्याचा आरोप यावेळी करण्या आला. यानंतर निवेदन देण्यासाठी पायदळ मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांना मधेच रोखण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र सरकारने राजकीय सुडापोटी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई सुरू केली आहे. नॅशनल हेराॅल्ड प्रकरणात गांधी कुटुंबीयांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करीत ‘मोदी जबजब डरते है, ईडी को आगे करते है’ अशा घोषणा देत जिल्हा काॅंग्रेसच्या वतीने शुक्रवारी महात्मा फुले चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना तिरंगा चौकात पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावून तासनतास बसवून ठेवले जात आहे. मोदी सरकारने राजकीय सुडापोटी ही कारवाई केली असून ईडीचा दुरुपयोग केला जात आहे. कुठलेही प्रकरण अंगावर येत असेल तर ईडीला पुढे करून मोदी सरकार स्वत:चा बचाव करीत आहे. यातूनच ही कारवाई होत असल्याचा आरोप यावेळी करण्या आला. यानंतर निवेदन देण्यासाठी पायदळ मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांना मधेच रोखण्यात आले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. सरते शेवटी आंदोलकांना अटक करण्यात आली.  काँग्रेसच्या आंदोलकांनी भाजप सरकारविरोधात नारेबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांनी केले. यावेळी माजी मंत्री माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, कीर्ती गांधी, वामनराव कासावार, विजय खडसे, प्रकाश पाटील देवसरकर, विजयाताई धोटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर, आरीज बेग, शहर अध्यक्ष चंदू चौधरी, प्रवीण देशमुख, महिला आघाडीच्या अध्यक्षा वंदना आवारी, प्रदेश सचिव जावेद अन्सारी आदींची उपस्थिती होती.

 

टॅग्स :congressकाँग्रेस