‘कोई जब राह न पाये, मेरे संग आये’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 06:00 AM2020-01-11T06:00:00+5:302020-01-11T06:00:09+5:30

येथील काव्य वाचन आणि गायनाच्या कार्यक्रमासाठी हे दृष्टीहीन विद्यार्थी आले होते. निळोणा परिसरात त्यांचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालला. त्यानंतर नाशिकला परत जाण्यासाठी हे पाचही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बसस्थानक परिसरात आले. मात्र यवतमाळ येथून रात्री नाशिकला जाण्यासाठी कोणतीही बस नव्हती. त्यामुळे हे विद्यार्थी कुठे जावे, काय करावे या विचारात चिंताग्रस्त झाले. कडाक्याच्या थंडीतही आयोजकांनी त्यांची व्यवस्था केली नव्हती.

'When No One Can Come, Come With Me' | ‘कोई जब राह न पाये, मेरे संग आये’

‘कोई जब राह न पाये, मेरे संग आये’

Next
ठळक मुद्देकार्यकर्त्यांचा संकल्प : भरकटलेल्या अंध विद्यार्थ्यांना दाखविला मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘कोई जब राह न पाये, मेरे संग आये, के पग पग दीप जलाये’ १९६१ च्या दोस्ती सिनेमातील अंध मित्रांच्या जीवनातील अंधकार दूर करणारे हे गाणे मंगळवारी रात्री यवतमाळात प्रत्यक्ष घडले. झाले असे की, नाशिकचे दृष्टीहीन विद्यार्थी मध्यरात्री यवतमाळच्या बसस्थानकात अडकून पडले. त्यांना यवतमाळातील कार्यकर्त्यांनी संपूर्ण व्यवस्था करून थेट त्यांच्या गावापर्यंत पोहोचविले.
येथील काव्य वाचन आणि गायनाच्या कार्यक्रमासाठी हे दृष्टीहीन विद्यार्थी आले होते. निळोणा परिसरात त्यांचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालला. त्यानंतर नाशिकला परत जाण्यासाठी हे पाचही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बसस्थानक परिसरात आले. मात्र यवतमाळ येथून रात्री नाशिकला जाण्यासाठी कोणतीही बस नव्हती. त्यामुळे हे विद्यार्थी कुठे जावे, काय करावे या विचारात चिंताग्रस्त झाले. कडाक्याच्या थंडीतही आयोजकांनी त्यांची व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेतील हे विद्यार्थी फिरत होते. शेवटी संकेत लांबट या युवकाला त्यांची अवस्था लक्षात आली. त्यांनी नगरसेवक नितीन मिर्झापुरे यांना ही बाब सांगितली. लगेच संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रलय टिप्रमवार, विनोद दोंदल हे मध्यरात्री बसस्थानक परिसरात पोहोचले. त्यांनी या विद्यार्थ्यांना गाठून दिलासा दिला. नितीन मिर्झापुरे यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. संकल्प फाऊंडेशनच्या व्यसनमुक्ती केंद्रात त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. केंद्राचे समन्वयक मधुकर चुटे हे त्यांच्या दिमतीला होते. तर सकाळी ७ वाजता प्रलय टिप्रमवार यांच्या वाहनाने या विद्यार्थ्यांना नाशिकपर्यंत पोहोचवून देण्यात आले. यासाठी अभिषेक इंगोले, स्वप्नील उजवणे, संजय मडावी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: 'When No One Can Come, Come With Me'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.