शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

यवतमाळ जिल्ह्यात ओले संकट; पुराच्या भीतीने आर्णी तालुक्याने जागून काढली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 10:32 IST

गेल्या तीन दिवसांपासून संततधारेने यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीसह काही तालुक्यांना झोडपून काढले आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अरुणावती धरणातील पाण्याची पातळी ६८ टक्क्यांवर गेल्यामुळे या तालुक्यातील नागरिकांनी गुरुवारची रात्र अक्षरश: जागून काढली.

ठळक मुद्देनदीकाठची बहुतांश गावे पाण्याखालीनाल्याचे पाणी उलटे गावात शिरलेशुक्रवारी सकाळी पाणी ओसरलेवाहतूक पूर्ववत, जनजीवन सामान्य

हरिओमसिंह बघेल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: गेल्या तीन दिवसांपासून संततधारेने यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीसह काही तालुक्यांना झोडपून काढले आहे. बुधवारी रात्री

पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अरुणावती धरणातील पाण्याची पातळी ६८ टक्क्यांवर गेल्यामुळे या तालुक्यातील नागरिकांनी गुरुवारची रात्र अक्षरश: जागून काढली. सोशल मिडियावरून सतत जागोजागीच्या अपडेटस एकमेकांसोबत शेअर करीत नागरिक एकमेकांना धीर देत सकाळ होण्याची वाट पहात जागत होते.गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघाड न दिल्याने अनेक प्रवासी जागोजागी अडकून पडले आहेत. गावागावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांनी शाळा, तहसील कार्यालये व मंदिरात आश्रय घेण्यास सुरुवात केली आहे. पूर येण्याची धास्ती प्रत्येकाच्या मनात असल्याने नागरिक दुकानांसमोर, बसस्थानकांवर समूहांत थांबले होते व वाढत्या पाण्याचा अंदाज घेत होते. रात्री बारानंतर पाण्याचा जोर थोडा कमी झाल्यानंतर या नागरिकांनी थोडासा सुटकेचा निश्वास टाकला.अरुणावती हे धरण आर्णी गावापासून सुमारे ३० कि.मी. अंतरावर आहे. हे धरण मंगळवारपर्यंत ३५ टक्के भरलेले होते. गुरुवारी रात्री १० वाजेपर्यंत त्याने ६८ टक्क्यांची पातळी गाठली होती. अरुणावती व पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या राणीधानोरा, कवठाबाजार, कोसदनी, मुकींदपूर, साकूर, आसरा या गावातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. गावात पाणी शिरल्याने दुकाने व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.धरणातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली तर धरणाचे गेट उघडले जातील आणि पूर येऊन आपले गाव बुडेल या धास्तीने अनेक दुकानदार रात्रभर दुकानांच्या छतांवर बसून राहिले. वॉटसअप व सोशल मिडियावरून गावोगावचे नागरिक आपापल्या गावातील स्थिती व फोटो एकमेकांसोबत शेअर करीत होते.शुक्रवारी सकाळी पाण्याचा जोर बराच कमी झाला असल्याने पाणी झपाट्याने ओसरू लागले आहे. पावसानेही उघडीप दिली असून, वाहतूक सुरू झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊस