शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जपानी तंत्रज्ञानाने गणेशवाडीत विहिरी तुडूंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 21:53 IST

जपानी तंत्रज्ञानाच्या रिचार्ज शाप या शास्त्रशुद्ध जलपुनर्भरणाने कळंब तालुक्यातील गणेशवाडी गावातील विहिरी पहिल्याच पावसात तुडुंब भरल्या. भूजल सर्वेक्षण विभागाच्या सहाय्याने कोरड्या विहिरींमध्ये जमिनीच्या लेव्हलपर्यंत पाणी साठवून हा अनोखा प्रयोग करण्यात आला.

ठळक मुद्दे‘रिचार्ज शाप’चा प्रयोग : जलपुनर्भरणाच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने ३० फुटांपर्यंत पाणी खेचले

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जपानी तंत्रज्ञानाच्या रिचार्ज शाप या शास्त्रशुद्ध जलपुनर्भरणाने कळंब तालुक्यातील गणेशवाडी गावातील विहिरी पहिल्याच पावसात तुडुंब भरल्या. भूजल सर्वेक्षण विभागाच्या सहाय्याने कोरड्या विहिरींमध्ये जमिनीच्या लेव्हलपर्यंत पाणी साठवून हा अनोखा प्रयोग करण्यात आला. यामुळे गावकरी आता सुखावले असून ही पद्धत दुष्काळग्रस्त यवतमाळ जिल्ह्यासाठी फायद्याची ठरणार आहे.कळंब तालुक्यातील गणेशवाडी हे गाव कायमस्वरूपी दुष्काळी. दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केल्याशिवाय पर्याय नाही. डोंगरमाथ्यावर वसलेल्या या गावातील नागरिक दुष्काळाच्या झळांनी चांगलेच त्रस्त झाले. त्यातच टँकरने पाणी पुरवठा करताना रस्त्याचीही अडचण. अशा या गावात पाणी टंचाई कायम स्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी जपानी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय भूजल सर्वेक्षण विभागाने घेतला. गावातून गेलेल्या नाल्यावर भेगाळलेल्या खडकांचा शोध घेतला. त्याचा अभ्यास करण्यात आला. या खडकाच्या मदतीने गावातील भूजल स्रोतात भर घालणे शक्य होणार असल्याचे निदर्शनास आले. या नाल्यावर १६ रिचार्ज शाप तयार करण्यात आले. त्यामुळे पाण्याची पुनर्भरण झाले. याचा फायदा पहिल्याच पावसात दिसून आला. गावातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या. या विहिरीवरून आता ओलित करून सिंचन करण्याची सुविधाही केली जाणार आहे. जपानी तंत्रज्ञानात पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत खेचण्याचा हा प्रयोग यवतमाळ जिल्ह्यात यशस्वी झाल्याने त्याची अंमलबजावणी इतरही ठिकाणी केली जाणार आहे. तसेच या प्रयोगाची दखलही राज्य शासनाने घेतली आहे.काय आहे ‘रिचार्ज शाप’?रिचार्ज शाप ही जलपुर्नभरणाची शास्त्रशुद्ध पद्धत आहे. यामध्ये ३० फुटापर्यंत खोल पाणी नेता येते. हे पाणी वाहून जाणाऱ्या खडकापर्यंत पोहोचविले जाते. यासाठी बोअरवेलचा जाळीदार केसिंग पाईप बसविला जातो. त्या भोवताल दगड आणि वाळू भरली जाते. या केसिंगला झाकण बसविले जाते. त्याला छिद्र असतात. पावसाचे पाणी या छिद्रांमधून थेट जमिनीत खेचले जाते. यामुळे पाणी वाहून न जाता थेट जमिनीत साठविले जाते.रिचार्ज शापने गणेशवाडीचा कायापालट झाला. आज गावातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहºयावर आनंद दिसत आहे. राज्य शासनाने याची दखल घेतली असून हे काम खर्चिक असले तरी दुष्काळावर मात करणारे आहे.-राजेश सावळेवरिष्ठ भूजल शास्त्रज्ञ, भूजल सर्वेक्षण विभाग.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानWaterपाणी