शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

वजन कमी-जास्त होते, केस गळतात, थायरॉईड तर नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 17:58 IST

Yavatmal : लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या

संतोष कुंडकर लोकमत न्यूज नेटवर्कवणी : सद्यःस्थितीत प्रत्येकाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला आहे. सकस आहाराचा अभाव, व्यायामाकडे दुर्लक्ष, वाढती व्यसनाधीनता यामुळे कोणत्या ना कोणत्या आजाराची बाधा होत आहे. अलीकडे थायरॉइडचे प्रमाणही वाढले आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हे प्रमाण अधिक दिसून येते. मानवी शरीरात अनेक बदल घडत असतात.

या बदलाच्या प्रक्रियेत थायरॉइडच्या पेशी नष्ट होतात. त्यातूनच हा आजार वाढतो. यात दोन प्रकारचे थायरॉइड होतात. या दोन्हा प्रकारच्या थायरॉइडवर वेगवेगळ्या पद्धतीने उपचार केले जातात. या आजारावर उपचार असल्याने हा असाध्य आजार नाही. याचे वेळीच निदान व उपचार केल्यास निरोगी जीवन जगता येते. सतत वजन कमी होणे-वाढणे, अशी लक्षणे दिसताच, तपासणी करून उपचार घेणे, हे या आजारात महत्त्वाचे ठरते. या आजारावर वेळेवर उपचार सुरू केल्यास या आजारावर नियंत्रण ठेवता येते. हा आजार महिला व पुरुष अशा दोघांनाही होऊ शकतो. मात्र महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे.

दहापैकी सात महिला थायरॉइड बाधितथायरॉइड ही गळ्याच्या पुढच्या भागात स्थित फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. जी चयापचय, शारीरिक वाढ आणि ऊर्जेच्या पातळीसह शारीरिक कार्ये नियंत्रित करणारे संप्रेरक तयार करते. महिलांमध्ये थायरॉइडचे प्रमाण अधिक आहे. दहापैकी सात महिलांमध्ये साधारणतः थायरॉइड दिसून येतो.

थायरॉईडचे लक्षणे काय?मंद हृदय गती, वजन वाढणे, बद्धकोष्ठता, नैराश्य, थकवा, कमकुवत केस आणि केस गळणे, कोरडी त्वचा, स्मरणशक्ती कमजोर होणे आणि अनियमित मासिक पाळी साधारणतः थायरॉइडची ही लक्षणे आहेत. वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.

अचानक वजन वाढणे-कमी होणे धोकादायकविशेषतः वजन कमी होणे वाढणे हे थायरॉइड विकाराची लक्षणे असू शकतात. हायपोथायरॉइडिझम, हे एक अक्रियाशील थायरॉइड आहे. ज्यामुळे कमी कॅलरी सेवनाने देखील वजन वाढते. याउलट, हायपरथायरॉइडिझम हा एक अतिक्रियाशील थायरॉइड आहे. ज्यात मेटाबॉलिसम वाढते, परिणामी अनपेक्षित वजन कमी होते.

काय काळजी घ्याल?

  • निरोगी अन्न खा, विशेषतः आयोडीनयुक्त सीफूड. धूम्रपान आणि अल्कोहोलयुक्त पेये टाळा. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या. तणावविरहित आयुष्य जगा.
  • चरबी आणि कर्बोदके खाणे कमी करा. ताजी फळे आणि हिरव्या भाज्या जास्तीत जास्त खावी.
  • आयोडिनयुक्त मीठ, मासे, कवच असलेले मासे, अंडी, दही आणि गायीच्या दुधाचा समावेश करावा. 

थायरॉईडमुळे असा होवू शकतो रुग्णाला त्रासथायरॉईड नोड्यूल्स असल्यास, रूग्णाचे अचानक वजन कमी होते, थकवा जाणवायला लागतो. तसेच स्नायू कमकुवत होतात, चिडचिड वाढते, कोरडी त्वचा, स्मृती समस्या, बद्धकोष्ठता, हृदयाचे ठोके अनियमित होतात. थायरॉईडची लक्षणे असलेल्या व्यक्तीमध्ये शरीरावर सूज येणे, त्वचा कोरडी पडणे, सहजतेने चरबी येणे, सहज थकवा आणि झोप येणे, थंडीची संवेदनशीलता वाढते

"थायरॉयइडचे प्रमाण वाढले आहे. त्यावर वेळीच उपचार झाले नाही तर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे लक्षणे दिसताच वेळीच तपासणी करून घ्यावे, डॉक्टरांनी दिलेला औषधोपचार नियमित घ्यावा, सुदढ आहाराचे सेवन करावे."- डॉ. गणेश लिमये, वणी 

टॅग्स :Healthआरोग्यYavatmalयवतमाळ