शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

मैतापूर गावात जाणारी वाट अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST

गेल्या कित्येक वर्षापासून या गावासाठी रस्ता नाही. गावातील लोकांनी यासाठी अनेकदा प्रयत्न केले. परंतु कोणीही याकडे लक्ष दिले नाही. मार्गात एक नाला लागतो. काही महिन्यांपूर्वी नाल्यावर तात्पुरत्या स्वरुपाचे ढोले टाकून कच्चा रस्ता तयार करण्यात आला. पहिल्याच पावसात या रस्त्याची पुरती ‘वाट’ लागली. गावातील कोणाला रुग्णालयीन अथवा महत्वाच्या कामालासाठी वाहनाने जायचे म्हटले तर जाता येत नाही.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : आदिवासीबहुल गाव, पांदण रस्त्यालाही लाजविणारा मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : मैतापूर हे कळंब तालुक्यातील छोटेशे गाव. केवळ २५ घरांची वस्ती. संपूर्ण गाव आदिवासीबहुल. त्यामुळेच की काय या गावात अजूनही यायला-जायला रस्ता तयार करण्यात आला नाही. लोकप्रतिनिधींना वारंवार सांगुनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आता तर ‘कोणी रस्ता देता का रस्ता’ अशी म्हणण्याची वेळ या गावातील नागरिकांवर आली आहे.गेल्या कित्येक वर्षापासून या गावासाठी रस्ता नाही. गावातील लोकांनी यासाठी अनेकदा प्रयत्न केले. परंतु कोणीही याकडे लक्ष दिले नाही. मार्गात एक नाला लागतो. काही महिन्यांपूर्वी नाल्यावर तात्पुरत्या स्वरुपाचे ढोले टाकून कच्चा रस्ता तयार करण्यात आला. पहिल्याच पावसात या रस्त्याची पुरती ‘वाट’ लागली. गावातील कोणाला रुग्णालयीन अथवा महत्वाच्या कामालासाठी वाहनाने जायचे म्हटले तर जाता येत नाही. गाडी घेऊन कोणी बाहेर निघू शकत नाही किंवा गावात जाऊ शकत नाही.शेतकऱ्यांना या रस्त्यावरुन शेतात जाताना मोठी कसरत करावी लागते. शेती साहित्य वाहून नेणे मोठे जिकरीचे काम असते. कोरोनामुळे विद्यार्थी घरीच आहे. अन्यथा त्यांच्या शाळेत जाण्याचा प्रश्नही गंभीर बनला असता. येथील रस्ता तातडीने तयार करण्याची गरज आहे. पक्का नाही तर केवळ वाहतुकीयोग्य तरी रस्ता तयार करावा, अशी मागणी पोलीस पाटील राजू पाटील, रवींद्र देवतळे, अंकुश नरुले, विश्वेश्वर मडावी, विष्णू मडावी, अक्षय जुगनाके, गणेश जुगनाके, विलास मडावी, दीपक चांदेकर, सुरज जुगनाके, भीमराव किनाके, बाबाराव मडावी, उत्तम जुगनाके, वासुदेव जुगनाके आदी गावकऱ्यांची केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक