शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
2
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
3
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
5
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
6
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
7
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
8
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
9
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
10
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
11
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
12
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
13
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
14
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
15
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
16
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
17
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
18
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
19
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
20
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!

अर्ध्या शहराला दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 21:33 IST

अर्ध्या अधिक शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य व्हॉलच गटारात असल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देपिण्याच्या पाण्याचा व्हॉलच गटारात : प्राधिकरणाचे खापर वीज मंडळ, बांधकामवर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अर्ध्या अधिक शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य व्हॉलच गटारात असल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे. गटारातील या व्हॉलमधून पिंपळगाव, वाघापूर, वडगाव, दर्डानगर अशा विविध भागाला दूषित पाण्याचा पुरवठा होतो आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरणाविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पहायला मिळत आहे.आर्णी रोड स्थित शिवाजी गार्डन परिसरात हा प्रकार दृष्टीस पडला. गटारात असलेला हा व्हॉल लिकेज असल्याने त्यातून सर्रास घाण पाणी पाईपलाईनद्वारे टाकीमध्ये व तेथून घराघरात पोहोचते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आधीच प्रचंड गटार व त्या भोवती सातत्याने वराहांचा संचार असल्याने पिण्याचे पाणी कोणत्या गुणवत्तेचे घराघरात पोहोचत असेल याची सहज कल्पना येते. याबाबत जीवन प्राधिकरणाकडे जाब विचारला असता त्यांनी थेट विकास कामे करणाऱ्या वीज वितरण कंपनी आणि बांधकाम खात्याकडे बोट दाखवून आपला बचाव करण्याचा केविलवाना प्रयत्न चालविला आहे. असेच अनेक लिकेज येथील गांधी चौक, मेन लाईन व शहराच्या विविध भागात ठिकठिकाणी आहे. त्याबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राधिकरणाकडे तक्रारीही केल्या जातात. परंतु प्राधिकरण त्याबाबत कधीच गांभीर्याने घेत नाही. पर्यायाने शहरातील लिकेज व दूषित पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे.शिवाजीनगर परिसरातील हा व्हॉल गेल्या अनेक महिन्यापासून फुटलेल्या अवस्थेत आहे. या संदर्भात नागरिकांनी जीवन प्राधिकरणाकडे तक्रार नोंदविली. त्यानंतरही हा व्हॉल दुरुस्त झाला नाही. यातून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊन तेथे डबके साचले आहे. या डबक्यातच परिसरातील सांडपाणी येऊन मिळते. तसेच यात डुकरांचा मुक्त संचार होतो. हेच दूषित पाणी नळावाटे नागरिकांच्या घरात पोहोचते. गेल्या कित्येक दिवसानंतर नळाचे आलेले पाणी नागरिक मोठ्या उत्सुकतेने भरतात. पाण्याचा रंग हिरवट पाहूनही तक्रार करीत नाही. याच पाण्यामुळे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरातील विविध भागात हा पाणीपुरवठा होत असल्याने डायरियासारखे आजार पसरण्याची भीती आहे. जीवन प्राधिकरण मात्र दुर्लक्ष करीत आहे.शिवाजीनगर गार्डनजवळील लिकेज व्हॉल दुरुस्तीचे काम जीवन प्राधिकरणाने हाती घेतले आहे. एक-दोन दिवसात काम पूर्ण होईल.- अजय बेले,कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण