शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पूस धरणातील पाणीसाठा आटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:31 IST

तालुक्याच्या दुर्गम व डोंगरी भागातील वनवार्लाजवळील पूस धरणातील पाणीसाठ दिवसेंदिवस कमी होत आहे. नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यावर मर्यादा असल्याने नदीच्या दुतर्फा शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या पाणीटंचाईची झळ पोहोचू लागली आहे.

ठळक मुद्देगाळ काढण्याची गरज : ४५ वर्षांपासून उपसा नाही, ४0 गावांवर पाणीसंकट

अखिलेश अग्रवाल।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्याच्या दुर्गम व डोंगरी भागातील वनवार्लाजवळील पूस धरणातील पाणीसाठ दिवसेंदिवस कमी होत आहे. नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यावर मर्यादा असल्याने नदीच्या दुतर्फा शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या पाणीटंचाईची झळ पोहोचू लागली आहे. गेल्या ४५ वर्षापासून या धरणातील गाळ न काढल्यामुळे धरणात पाणी कमी अन् गाळ जादा, अशी अवस्था झाली आहे.पुसदपासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर वनवार्ला गावाजळ पूस धरण बांधण्यात आले. या धरणाला जवळपास ४५ वर्ष पूर्ण झाले आहे. तालुक्यातील तब्बल ४० गावांना या धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो. पुसद परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसह पुसद शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या धरणामुळे काही अंशी संपुष्टात आला आहे. पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने धरण भरल्यानंतर हिवाळ्यात धरणातील पाणी नदी पात्रात सोडून ते बंधाऱ्यात अडवून शेती व पिण्यासाठी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र धरणातच पाणी कमी असल्याने नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतकºयांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.यावर्षी सध्याच्या घटकेला धरणात केवळ १२ टक्के पाणीसाठ आहे. सध्या पुसदकरांना पालिका प्रशासन तीन दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. यापुढे यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. सध्या पूस धरणातील पाणीसाठी कमी झाल्याने धरणामध्ये गाळ किती आहे, ते दिसू लागले आहे. या धरणामध्ये भरमसाठ गाळ साचल्याने आपोआपच त्याची जल साठवण क्षमता कमी झाली आहे. पावसाळ्यात त्यामुळेच कमी पाऊस झाल्यावरदेखील धरण भरण्यास वेळ लागत नाही. परंतु गाळ हा धरण भरण्यातील मुख्य घटक आहे.धरणामधील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी पावसाळा सुरु होण्यापूर्वी हा गाळ काढण्याची गरज आहे. धरणातील गाळाचा उपसा केल्यास जलस्त्रोतांच्या मार्गातील अडथळा दूर होऊन जल साठवण क्षमतेत वाढ होऊ शकते. धरणातून काढण्यात आलेल्या गाळाचा उपयोग शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी करता येऊ शकतो. सध्या गाळ काढणे शक्य आहे. गाळ काढल्यास धरणाची जलक्षमता वाढून पुढील काही वर्षे तरी टंचाईपासून पुसदकरांची सुटका होऊ शकते.तीन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईपुसद शहर व परिसरातील ग्रामीण भागात दोन-तीन महिन्यांपासून पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. सध्या तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला. शहराला पाणी पुरवठा करणाºया उर्ध्व पूस धरणातील पाण्याचा साठ संपत आहे. धरणाची निर्मिती झाल्यापासून या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली आहे. येत्या काही वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गाळ उपसावा, अशी मागणी बापू अणे स्मृती प्रतिष्ठानने जिल्हाधिकाºयांकडे केली.

टॅग्स :Damधरण