शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड तालुक्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 21:49 IST

हिवाळा सुरु असतानाच तालुक्यातील तब्बल ४३ गावात भीषण पाणीटंचाई सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीपर्यंत आणखी अनेक गावचांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे४३ गावे : आढावा बैठकीत ‘वास्तव’ उघड, उन्हाळ्यात समस्या वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : हिवाळा सुरु असतानाच तालुक्यातील तब्बल ४३ गावात भीषण पाणीटंचाई सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीपर्यंत आणखी अनेक गावचांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.येथील जिजाऊ भवनात आमदार राजेंद्र नजरधने यांनी गुरूवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत पाणीटंचाईची दाहकता उघड झाली. यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने तालुक्यावरील दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पंचायत समिती सभापती प्रवीण मिरासे, तहसीलदार भगवान कांबळे, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, राम देवसरकर, पंकज मुडे, पंचायत समिती सदस्य बालाजी आगलावे, प्रज्ञानंद खडसे, नयन पुद्दलवाड, गजानन सोळंके, सविता कदम, रमेश आडे, अरविंद माने यांच्यासह तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी, सरपंच, सचिव बैठकीला उपस्थित होते. या सवांनीच पाणीटंचाईची दाहकता स्पष्ट केली.सध्या तालुक्यातील बोथा, ब्राम्हणगाव, मेट, बाळदी, चिंचोली (ढा.), चुरमुरा, धानोरा, दिघडी, दिंडाळा, गांजेगाव, हरदडा, हातला, करंजी, कोप्रा,मानकेश्वर, मन्याळी, मोरचंडी, मुळावा, मुरली, नारळी, अकोली, सावळेश्वर, बेलखेड, भवानी, बोरी वन, चिंचोली सं., नागेशवाडी, निंगणूर, पिंपळगाव वन, दिवटपिंप्री, सोईट घ., सोनदाबी, सोईट म., सुकळी (न.), ईसापूर, तरोडा, टेंभुरदरा, तिवडी, उंचवडद, विडूळ, वरूड बीबी अशा ४३ गावांत पाणीटंचाई सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या गावातील सरपंच, सचिवांनी पाणीटंचाईवर उपाययोजना व प्रशासनाकडून होत असलेल्या अडचणीबाबत माहिती दिली. आमदारांनी उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. संचालन विस्तार अधिकारी संतोष डाखोरे, तर प्रास्ताविक धारपवार यांनी केले.सांघिक प्रयत्नांची गरजतालुका भीषण दुष्काळात सापडला असून शासनाने अनेक सवलती जाहीर केल्या. त्याचा लाभ घेत दुष्काळ निवारायचा आहे. त्यासाठी सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, सचिवांनी सांघिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी सांगितले. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई