शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा तालुक्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 22:03 IST

तालुक्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेने कमी पाऊस पडला. परतीच्या पावसाने थोडी भर घातली असली तरी कोणताही पाऊस सार्वत्रिक पडला नाही.

ठळक मुद्देअत्यल्प पाऊस : ५९ गावांतील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेने कमी पाऊस पडला. परतीच्या पावसाने थोडी भर घातली असली तरी कोणताही पाऊस सार्वत्रिक पडला नाही. त्यामुळे प्रकल्पांची वाईट अवस्था आहे. अडाणसह नदी-नाले कोरडे पडले असून शहर व ग्रामीण भागावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.जून, जुलै या महत्वाच्या महिन्यात ३२० मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर २१७ मिमीची भर पडली तरी पाऊस तुरळक पडला. त्यामुळे तालुक्यातील सर्वात मोठ्या म्हसबी प्रकल्पात केवळ २५ टक्केच जलसाठा होऊ शकला. प्रकल्पाचे पाणी नदीत न सोडल्याने अडाण कोरडी पडली. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला. त्याच बरोबर ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारे तलाव, सार्वजनिक, खासगी विहिरी, आटल्यामुळे आतापासूनच टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. दारव्हा तालुक्यात यावर्षी ५३७ मिमी पावसाची नोंद झाली. परंतु एकही पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा पडला नाही. जून, जुलै सारख्या महिन्यात तुषार सिंचनासारख्या धारा बरसल्या. एकही झळ अनुभवता आली नाही. यावर्षी दमदार पावसाची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. परिणामी एकाही प्रकल्प, तलावांना पातळी गाठता आली नाही. सर्वात मोठ्या म्हसनी प्रकल्पात केवळ २२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. कुंभारकिन्ही, गोखी, अंतरगाव या प्रकल्पाचीसुद्धा वाईट अवस्था आहे. सिंचन, पाझर तलाव, नदी, नाले कोरडे पडले आहे. सार्वजनिक खासगी विहिरी, हँडपंप आदींची पातळी कमी झाल्याने तळ गाठला आहे. अर्ध्याअधिक शहराला पाणीपुरवठा करणारी नगरपरिषदेची पेकर्डा पाणीपुरवठा योजना अडाण नदी अटल्यामुळे बंद पडली आहे. त्यामुळे अरुणावती प्रकल्पावरून नवीन वसाहत, रेल्वे स्टेशन परिसर, मुंगसाजी मंदिर रोड, उत्तरेश्वर चौक, बाराभाई मोहल्ला, मल्लिकार्जुन मंदिर रोड तर कुपटी योजनेवरून नातूवाडी, राम मंदिर परिसर, गणपती मंदिर, तेलीपुरा, अंबादेवी मंदिर परिसर, टिळकवाडी, दत्तनगर, भुरेखानगर, खाटीकपुरा, गवळीपुरा आदी भागात तीन-चार दिवसाआड पाणी सोडण्यात येत असल्याचे नगरपरिषदेच्यावतीने सांगण्यात आले. परंतु पुढे सात-आठ महिने बाकी आहे. कुंभारकिन्ही प्रकल्पाचे पाणी संपले तर शहरात भीषण स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आतापासूनच पर्यायी उपाययोजना शोधाव्या लागणार आहे. शहरासोबतच ग्रामीणमधील जवळपास ५९ गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. काही गावातील नळ योजना तलाव विहिरीतील पाण्याची पातळी घटल्याने प्रभावित झाला आहे. हँडपंप बंद पडले आहे. सध्या हिवाळ्यात ही स्थिती असून उन्हाळ्याचे चार महिने कसे होईल याची चिंता सर्वांना लागली आहे.पाणीटंचाईवर मात करण्याचे प्रयत्नयावर्षी दारव्हा तालुक्यात कमी पाऊस पडल्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते. कोणत्या गावात पाणी समस्या उद्भवू शकते याची माहिती घेण्यात आली आहे. त्यासंबंधीचा कृती आराखडा तयार करून कामे केले जातील. यावर्षी भीषण स्थिती असली तरी पाणीटंचाईवर मात करण्याचे आमचे प्रयत्न असल्याचे पंचायत समिती सभापती उषाताई प्रेमसिंग चव्हाण यांनी सांगितले.पेकर्डा पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने पूर्ण भार अरुणावती व कुपटी योजनेवर आहे. अरुणावती योजनेची अडचण नाही. परंतु कुंभारकिन्ही प्रकल्पाचे पाणी बंद झाल्यास समस्या उद्भवू नये याकरिता कुपटी योजनेजवळ बोअर मारण्यात येणार आहे. त्यामुळे मुबलक पाणी मिळेल व कोणतीही अडचण जाणार नाही.- आरिफ काजी,सभापती, पाणीपुरवठा नगरपरिषद.