शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

लोहारा परिसराला पाणीटंचाईचा विळखा

By admin | Updated: May 20, 2017 02:33 IST

शहरातील सर्वात झपाट्याने वाढणारा परिसर म्हणजे लोहारा भाग होय. पूर्वी लोहारा ही स्वतंत्र ग्रामपंचायत होती,

केवळ एक टँकर सुरू : बोअरवेल व विहिरींनीही गाठला तळ, प्राधिकरणाचे नळही नाही लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहरातील सर्वात झपाट्याने वाढणारा परिसर म्हणजे लोहारा भाग होय. पूर्वी लोहारा ही स्वतंत्र ग्रामपंचायत होती, परंतु आता हा भाग सुद्धा यवतमाळ नगर परिषदेत विलिन झाला आहे. मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती असलेल्या या भागात दरवर्षीच तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. परंतु आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाही. पूर्वी ग्रामपंचायत असताना काही तरी सुविधा केल्या जात होत्या. परंतु आता नगर परिषदेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप या भागातील नागरिकांचा आहे. सध्या मे महिन्यात तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. प्रकल्पातील पाण्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे नळांनाही पाणी नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आठवड्यातून दोनवेळ नळ सोडले जातात. परंतु कमी दाबाने येणाऱ्या नळामुळे नागरिकांचे चांगलेच हाल आहे. अनेक भागात नळाचे पाणी पोहचत नाही. मागील वर्षी लोहारा परिसरातील पाणीटंचाईग्रस्त भागात सात ते आठ टँकर नियमितपणे सुरू होते. यावर्षी नगर परिषदेचे केवळ एक टँकर सुरू केले असून समाजसेवी अनिल यादव यांनी नागरिकांसाठी स्वत: एक टँकर सुरू केले आहे. या दोन टँकरच्या भरोशावर मोठ्या भागात असलेल्या पाणीटंचाईवर नियंत्रण मिळविणे शक्य होताना दिसत नाही. शिवाजी नगर झोपडपट्टी, रेणुका नगर, देवी वॉर्ड, साने गुरुजी कॉलनी, मैथीली नगर, बोदड, प्रिया रेसिडन्सी, साठवणे ले-आऊट आदी भागात तीव्र पाणीटंचाई आहे. यातील बहुतांश भागात तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ नाहीत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना बोअरवेल व विहिरींवरच अवलंबून रहावे लागते. परंतु उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये बोअरवेल, विहिरी आणि हातपंपांनीही तळ गाठला आहे. अनेकजण खासगी टँकर विकत घेत आहेत. परंतु पाचशे ते सातशे रुपयांचे टँकर घेणे प्रत्येकालाच परवडणारे नसते. तसेच पाण्याची साठवण करण्याचे साधनेही घरात नसतात. त्यामुळे गटागटाने नागरिक टँकर विकत घेतात. तीन ते चार घरांमिळून टँकर घेऊन सर्व मिळून पैसे देतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाण्याचे बिल भरल्यानंतरही अशाप्रकारे पुन्हा आर्थिक भूदंड सर्वसामान्य व गोरगरिब नागरिकांना सहन करावा लागत आहे. शिवाजी नगर, पांढरी परिसरातील हातपंपही आटल्याने येथील नागरिकांची चांगलीच कसरत सुरू आहे. या परिसरात गोरगरीब व हातमजुरी करणारे नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. या नागरिकांना विकतचे पाणी घणे परवडणारे नाही. लोहारा वळणमार्गावर पाण्याची नवीन टाकी झाली आहे. या टाकीवरून काही नागरिकांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. सध्या तरी या टाकीचा लोहारा परिसरातील नागरिकांना आवश्यक तो फायदा होताना दिसत नाही. नगर परिषदेने या भागात पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरच्या फेऱ्या वाढवाव्या, अशी मागणी आहे. पाणीसमस्या कायमस्वरुपी सुटावी लोहारा परिसरातील पाणीसमस्या ही दरवर्षीचीच आहे. परंतु याकडे गांभिर्याने कुणीच लक्ष देण्यास तयार नाही. नगर परिषदेकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु नगर परिषदेनेही भ्रमनिरास केल्याचे नागरिक सांगतात. नवीन टाकी झाली, परंतु या टाकीचाही फायदा अद्याप दिसून येत नाही. काही ठराविक भागातील नागरिकांना या टाकीवरून नळजोडण्या दिल्या आहेत. या भागातील सरसकट नळजोडण्या याच टाकीवरून जोडण्याची गरज आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे. पावसाळ्यापूर्वी ते शक्य होताना दिसत नाही. लोहारा परिसर मोठ्या प्रमाणात पसरला आहे. दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या प्रमाणात पाण्याची सोय होताना दिसत नाही. नगर परिषद ज्या प्रमाणात करवसुली आणि त्यासाठी मोजणी व नोंदणीवर जोर देत आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर मात्र कोणताही जोर देत नाही. त्यामुळे नागरिकांध्ये रोष निर्माण होणे सहाजिक आहे.