शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

कुरघोडीच्या राजकारणात शहराची कचरा कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:31 IST

नगर परिषदेतील राजकीय विसंगतीचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. राज्य व केंद्रात युतीची सत्ता असली तरी नगरपरिषदेत शिवसेना भाजपातच विस्तव जात नाही. शिवसेनेकडे नगराध्यक्षपद तर सभागृहाचे बहुमत भाजपाकडे आहे. या दोन्ही पक्षात स्थानिक पातळीवर टोकाच्या विरोधाचे राजकारण सुरू असल्याने शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरातील सध्याची कचरा कोंडी हा त्याचाच परिणाम आहे.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपालिकेचा कारभार : कंत्राटदाराने दिला पुन्हा कामबंदचा ‘अल्टिमेटम’

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगर परिषदेतील राजकीय विसंगतीचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. राज्य व केंद्रात युतीची सत्ता असली तरी नगरपरिषदेत शिवसेना भाजपातच विस्तव जात नाही. शिवसेनेकडे नगराध्यक्षपद तर सभागृहाचे बहुमत भाजपाकडे आहे. या दोन्ही पक्षात स्थानिक पातळीवर टोकाच्या विरोधाचे राजकारण सुरू असल्याने शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरातील सध्याची कचरा कोंडी हा त्याचाच परिणाम आहे.नगराध्यक्षांचे संपूर्ण अधिकार गोठवून त्यांना रबर स्टॅम्प बनवले आहे. तर नगराध्यक्षांवर कुरघोडीसाठी पालिकेतील प्रशासन प्रमुखाला पूर्णत: अभय दिले आहे. त्यामुळे एकांगी कारभार सुरू आहे. जनतेच्या सोयी सुविधेकडे लक्ष देण्याऐवजी मर्जी राखण्याचा कार्यक्रम येथे सुरू आहे. यातूनच नगरपरिषद आर्थिक दिवाळखोरीत निघाली आहे. शहरातील विकासकामांना या राजकीय कुरघोडीची दुष्ट लागली आहे. या कुरघोडीत भविष्यातील भयावह अशा समस्या दडल्या आहे. याचे परिणाम दुरगामी होणार असून ते यवतमाळच्या अधोगतील कारणीभूत ठरणारे आहेत. हे सर्व समजून उमजूनही याला कोणीच उघड विरोध करताना दिसत नाही. बहुमताच्या जोरावर सोयीचे निर्णय घेतले जात आहे. विरोधकही यावर एका मर्यादेपलिक डे जाऊन भूमिका घेण्यास तयार नाही. प्रशासन प्रमुखाला बहुमताची प्रत्येक वेळी साथ मिळत आल्याने अनेक निर्णय चुकीच्या पद्धतीने लादले गेले आहेत. कचऱ्याची समस्याही यातूनच निर्माण झाली आहे. कधी काळी शहराला स्वच्छतेचा पुरस्कार मिळवून देणाºया माजी नगराध्यक्षांच्या अर्धांगिनी अध्यक्षपदावर विराजमान आहे. शिवाय त्याच काळात प्रशासकीय बाजू सांभाळणारे मुख्याधिकारी येथे कार्यरत आहे. सत्ताधारी आमदारही भाजपाचे असून आता त्यांना राज्य सरकारातील भारदस्त मंत्रीपद मिळाले आहे. त्यानंतरही केवळ राजकीय सुडबुद्धीमुळे शहराची वाताहत होत आहे. नगरसेवकांची ७० टक्के टीम नवीन असली तरी जुन्या ज्येष्ठांनी सोयीस्कररित्या भूमिका बदलल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.स्वच्छ व सुदंर शहर अशी स्वप्ने दाखविणारे कार्यसम्राट नेते व कार्यकर्त्यांचे कार्य केवळ गावात फलकबाजी करण्यापुरतेच मार्यादित दिसत आहे. चुकीचे निर्णय घेऊन नगरपरिषदेचा संपूर्ण कारभार आतबट्ट्यात आणला आहे. नियमांची ऐसीतैशी करून केवळ आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्याचा सपाटा सुरू आहे. यातूनच शहरात कचºयाचे संकट उद्भवले आहे. नगरपरिषदेचा कारभार अजूनही बहुतांश नगरसेवकांना उलगडलाच नाही. त्यामुळे ‘हो च्या पुढे आणि नाही च्या मागे’ इतकीच त्यांची उपलब्धी आहे. अनेक स्वार्थी पदाधिकारी व धुर्त सदस्य यांचा पूरेपूर वापर करून घेताना दिसत आहे. शहरात विकासकामांची रेलचेल सुरू आहे. मात्र याच विकासकामात शहराच्या दुर्दशेचे बिजारोपण झाले आहे. काळाच्या ओघात आता एक एक समस्या पुढे येत आहे. दोन वर्षापूर्वीच कचरा डेपोसाठी नवीन जागा प्रस्तावित करून त्याची प्रक्रिया पूर्ण केली असती तर आजची समस्या निर्माण झाली नसती. कचरा उचलण्याच्या कंत्राटातही हीच भूमिका आडवी आली आहे. नियमानुसार नवीन कंत्राट काढून त्यावर १४ व्या वित्त आयोगातून आर्थिक तरतूद केली आहे. मात्र हा शासनाने दिलेला पैसा खर्च करण्याऐवजी नगपरिषद फंडातून आर्थिक उधळपट्टी करण्यात आली. आता सामान्य फंडातील पैसा संपल्याने कंत्राटदाराची देयके थकली आहे. नवीन निविदा प्रक्रिया करेपर्यंत पर्यायी कंत्राट चालविणेही नियमबाह्य आहे. पालिका प्रशासनच नियमांची वासलात लावून शहराच्या स्वच्छतेचे धिंडवडे काढत आहे. हा प्रकार सर्वच सदस्य अगदी भाबडेपणाने खपवून घेत आहे.कचरा कंत्राटदाराने कामबंद करण्याची नोटीस दिली आहे. ११ जुलैपासून तो बंद पुकारणार आहे. सध्या कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे एकमेव जागा आहे. तिथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने घंटागाड्या जावू शकत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री मदन येरावर यांची भेट घेतली. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतील संयुक्त बैठकीत तोडगा काढणार आहेत.- जगदीश वाधवाणी, आरोग्य सभापती, नगरपरिषद, यवतमाळसमस्या निदर्शनास आणून देऊनही काहीच करत नाही. पावसाळा सुरू होऊन मान्सूनपूर्व उपाययोजना नाही. कंत्राटदाराला ब्लॅक लिस्टेड करायला पाहिजे. पैसा भरपूर खर्च होत असूनही समाधानकारक काम नाही. आंदोलनाशिवाय कोणताच पर्याय नाही, त्यालाही प्रशासन दाद देत नाही.- चंद्रशेखर चौधरी, विरोधी पक्षनेते, नगरपरिषद, यवतमाळ