वखार महामंडळाच्या गोदामाला आग

By Admin | Updated: May 18, 2016 02:37 IST2016-05-18T02:37:49+5:302016-05-18T02:37:49+5:30

येथील धामणगाव मार्गावरील वखार महामंडळाच्या गोदामात संरक्षित सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागण्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.

The warehouse's godown fire | वखार महामंडळाच्या गोदामाला आग

वखार महामंडळाच्या गोदामाला आग

मोठा अनर्थ टळला : संरक्षित रसायनाच्या सिलिंडरचा स्फोट
यवतमाळ : येथील धामणगाव मार्गावरील वखार महामंडळाच्या गोदामात संरक्षित सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागण्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविता आल्याने मोठा अनर्थ टळला.
येथील धामणगाव मार्गावर वखार महामंडळाचे गोदाम आहे. या गोदामात धान्याचे पोते ठेवण्यात आले आहे. दुपारी ४ वाजताच्या सुमारास धान्याच्या सुरक्षेसाठी संरक्षित रसायन फवारले जात होते. यावेळी रसायनाच्या सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे गोदामात आग भडकली. हा प्रकार लक्षात येताच गोदामातील फायर फायटरने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू झाला. तसेच नगर परिषदेच्या अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आली. आगीवर कर्मचाऱ्यांच्या मदतीने वेळीच नियंत्रण मिळविण्यात आले. त्यामुळे या गोदामातील तांदूळाचे एक हजार पोते वाचविण्यात आले.
आग लागताच तेथील कर्मचाऱ्यांनी तांदुळाचे पोते हमालांच्या मदतीने तत्काळ बाहेर काढण्यास सुरुवात केली. तसेच आगीवरही नियंत्रण मिळविणे सुरू केले. पाण्याचा मारा झाल्याने तांदळाचे अनेक पोतेही ओले झाले.
ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्नीशमन दलाचे दिलीप बोपचे, शहेबाज खान, निलेश चव्हाण यांच्यासह वखार महामंडळाचे केवलेश राठोड, सतेंद्र सिंग यांनी परिश्रम घेतले. ही आग वेळीच आटोक्यात आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. आधीच तापमान ४४ अंशाच्यावर पोहोचले असून अशा परिस्थितीत लागलेली आग नियंत्रणात आल्याने वखार महामंडळाचे मोठे नुकसान टळले. (शहर वार्ताहर)

Web Title: The warehouse's godown fire