शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वणी तालुक्यात खरिपाची ३० टक्के पेरणी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:33 IST

यंदा मॉन्सून अगदी वेळेवर दाखल झाल्याने व सुरूवातीच्या चार दिवसांत पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने त्या बळावर शेतकऱ्यांनी कपाशीची टोबणी केली खरी; पण गेल्या तीन दिवसांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे.

ठळक मुद्देपावसाने मारली दडी : कपाशी उदरातच करपण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदा मॉन्सून अगदी वेळेवर दाखल झाल्याने व सुरूवातीच्या चार दिवसांत पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने त्या बळावर शेतकऱ्यांनी कपाशीची टोबणी केली खरी; पण गेल्या तीन दिवसांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. येत्या २४ तासांत पाऊस न आल्यास टोबणी केलेले कपाशीचे बी धरित्रीच्या उदरातच करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मृग नक्षत्रावर पावसाचे आगमन झाले. सुरूवातीचे चार दिवस १०८ मि.मी.पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. हा पाऊस कायम राहील, या आशेवर शेतकºयांनी कपाशीच्या लागवडीला प्रारंभ केला. आजच्या तारखेत जवळपास ३० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. वणी तालुक्यात ६४ हजार ३० हेक्टर जमिन वहितीखाली आहे. त्यातील १३ हजार ७४० हेक्टरवर आजपर्यंत कपाशीची लागवड आटोपली आहे. ८६३ हेक्टरवर तूर पिकाची पेरणी करण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत शेतात ओल असल्याने या पिकांची स्थिती उत्तम होती. बुधवारी पाऊस येईल, अशी आस लावून शेतकरी बसले होते. मात्र दिवसभर तीव्र उन्हं होते. वाढत्या तापमानाने जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. कर्ज काढून शेतात पेरलेले बियाणे करपून तर जाणार नाही ना, ही भीती शेतकºयांच्या मनात आहे. अद्याप शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीला सुरूवात केली नाही. मात्र आठ ते नऊ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार असल्याचा अंदाज तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Farmerशेतकरी