शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

वणी, पांढरकवड्याला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 05:00 IST

सोमवारी दुपारी वणी तालुक्यात वणी, मारेगाव व झरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. सायंकाळी ४ वाजेपर्यंत हा पाऊस बरसला. त्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत पावसाने विश्रांती घेतली. मात्र ११ वाजतानंतर पुन्हा धुव्वादार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस दुपारी १२ वाजेपर्यंत सुरूच होता. त्यानंतर मात्र पावसाने ब्रेक दिला. या मुसळधार पावसामुळे वणी उपविभागातील वाहणाऱ्या विदर्भा, निर्गुडा, वर्धा या नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी उपविभागात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी दुपारपर्यंत अक्षरश: थैमान घातले. या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला. शेकडो हेक्टर शेतात पाणी शिरले. कापणीवर आलेले सोयाबीन व वेचणीवर आलेला कापूस या पावसाने मातीमोल केला. मंगळवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली असली तरी ढगांनी आभाळ दाटून होते. २४ तासात वणी तालुक्यात ८५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दुपारी वणी तालुक्यात वणी, मारेगाव व झरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. सायंकाळी ४ वाजेपर्यंत हा पाऊस बरसला. त्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत पावसाने विश्रांती घेतली. मात्र ११ वाजतानंतर पुन्हा धुव्वादार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस दुपारी १२ वाजेपर्यंत सुरूच होता. त्यानंतर मात्र पावसाने ब्रेक दिला. या मुसळधार पावसामुळे वणी उपविभागातील वाहणाऱ्या विदर्भा, निर्गुडा, वर्धा या नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली. २४ तासात वणी तालुक्यात ८५ मीमी पाऊस कोसळला. झरी तालुक्यात २६ मिमी, तर मारेगाव तालुक्यात १६ मिमी पाऊस कोसळला. बॉक्स : अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्पविदर्भा नदीला पूर आल्यामुळे कायरलगतच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला. वणीलगतच्या वागदरा व कवडशी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता पूर्णत: बंद झाला होता. वारगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने चारगाव ते वारगाव हा रस्ता पूर्णत: बंद झाला. विठ्ठलनगरमध्ये पाणी वाहत असल्याने याठिकाणचीही वाहतूक बंद होती. पेटूर पुलावरून दुपारपर्यंत पाणी वाहत होते. नांदेपेरा येथे नाल्याच्या पुरामुळे  नांदेपेरा, शेलू खु., भुरकी, रांगणा या गावांचा वणी शहराशी संपर्क तुटला होता. वणी-घोन्सा मार्गावरील वणीलगतच्या ड्रीम लँड सिटीजवळून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत वणी-घोन्सा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वणी-नांदेपेरा चौफुलीवरील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने हा मार्गदेखिल बंद झाला होता. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. 

अनेक घरात पाणी शिरले- मुसळधार पावसामुळे सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वणी तालुक्यातील पठारपूर येथे गावालगतच्या शेतातील पावसाचे पाणी पाच ते सहा घरात शिरले. यासोबतच सावर्ला गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याचे पाणीदेखिल अनेक घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. घरातील साहित्य पावसात भिजले. 

सोयाबीनची गंजी गेली पुरात वाहून- वणी तालुक्यातील रांगणा येथे गावालगत असलेल्या नाल्याला व वर्धा नदीला पूर आल्याने नाल्यालगत असलेल्या नवनाथ लोडे यांच्या शेतात कापणी करून ठेवलेली सोयाबीनची गंजीच पुरात वाहून गेली. त्यामुळे त्यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. यासोतच प्रकाश लोडे यांच्या शेतातील रासायनिक खत व बैलांचा चारा पुरात वाहून गेला. शिवशंकर कातकर यांचे कपाशीचे पीक पुरात वाहून गेले. 

गुंजचे मंदिर, अंगणवाडी पाण्यात- वणी शहरालगत वरोरा मार्गावर असलेल्या गुंजच्या मारोती मंदिराचा परिसर संपूर्ण पाण्याने वेढला होता. या मंदिराजवळून वाहणाऱ्या नाल्याला मोठा पूर आल्याने पहिल्यांदाच या मंदिर परिसरात पाणी शिरले. वणी तालुक्यातील निळापूर येथील अंगणवाडीतही पाणी शिरले. या हंगामात पहिल्यांदाच या भागात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने शेतपिकांची मोठी हानी झाली आहे. 

निंबाळालगत शेतात वीज कोसळली- मंगळवारी सकाळी काही काळ विजांचा कडकडाटही झाला. याचदरम्यान वणी-यवतमाळ मार्गावरील निंबाळा गावालगतच्या राजू आसेकर यांच्या शेतातील सागवानाच्या झाडावर वीज कोसळली. यामुळे गावाला मोठा हादरा बसला. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र परिसरात या घटनेने भीतीचे वातावरण आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर